शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिश प्रशासन, इंटरपोलच्या डोळ्यात धूळ फेकत नीरव मोदीने केली अमेरिकावारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 20:08 IST

रेड कॉर्नर नोटीस निघाले असतानाही हा नीरव मोदी फेब्रुवारी महिन्यात इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशानाच्या डोळ्यात धुळफेक करत अमेरिकेला जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे.

लंडन - पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालून पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या इंग्लंडमध्ये अटकेत आहे. मात्र त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस निघाले असतानाही हा नीरव मोदी फेब्रुवारी महिन्यात इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशानाच्या डोळ्यात धुळफेक करत अमेरिकेला जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, भारतीय तपास संस्थांनी ब्रिटिश प्रशासनाच्या कार्यप्रणालीविरोधात नाराजी नोंदवली आहे. इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस बजावलेली असतानाही निरव मोदीला अमेरिकेला जाण्याची परवानगी कशी काय मिळाली, असा प्रश्न भारताकडून उपस्थित करण्यात आला आहे.  जेव्हा कुठल्याही व्यक्तीविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली जाते तेव्हा त्या व्यक्तीला कुठल्याही देशाचे इमिग्रेशन अधिकारी ताब्यात घेऊ शकतात. मात्र निरव मोदी अमेरिकेला कसा गेला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. भारतीय यंत्रणांकडे निरव मोदीच्या अमेरिका प्रवासाची विसृत माहिती आहे. तसेच त्याचे तिकिटही भारतीय तपास यंत्रणांकडे आहे. या कागदपत्रांचा वापर नीरव मोदी ज्यावेळी न्यायालयात जामिनासाठी अर्ज करेल त्यावेळी पुरावा म्हणून केला जाणार आहे. सध्या इंग्लंडमधील वेस्टमिंस्टर कोर्टाने नीरव मोदीला 26 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावलेली आहे. दरम्यान, त्याचे लवकरात लवकर भारतात प्रत्यार्पण व्हावे, यासाठी भारतीय तपास यंत्रणा प्रयत्नशील आहेत.  

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरारी झालेल्या नीरव मोदीला ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात अटक करण्य़ात आली होती. 29 मार्च रोजी त्याच्या जामीनअर्जावर तेथील न्यायालयाने सुनावणी घेतली होती. यावेळी त्याचा जामीन नाकारण्यात आला.  र नीरव मोदीच्या वकिलाने तो जानेवारी 2018 पासून ब्रिटनमध्ये राहत असून लपून राहत नाही. तसेच जर त्याला जामीन देणार नसाल तर त्याला नजरकैदेत ठेवण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. तसेच त्याला स्थानिक पोलिस ठाण्यात रोज हजेरी लावण्याचे आणि मोबाईल देण्याची मागणीही केली होती.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाIndiaभारतEnglandइंग्लंडUnited Statesअमेरिका