शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

नऊ वर्षांनी मोशे येणार मुंबईमध्ये, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहूंचा भारत दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 16:27 IST

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू जानेवारी महिन्यामध्ये भारतात येत आहेत. त्यांच्याबरोबर मोशेसुद्धा येणार आहे. मोशेचे आई-वडिल मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले होते.

ठळक मुद्देभारताला भेट देणारे नेत्यानाहू हे दुसरे इस्रायली पंतप्रधान ठरतील.यापुर्वी २००३ साली अरायल शेराँन यांनी भारताला भेट दिली होती. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते.

नवी दिल्ली- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू जानेवारी महिन्यामध्ये भारतात येत आहेत. त्यांच्याबरोबर मोशेसुद्धा येणार आहे. मोशेचे आई-वडिल मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. खाबाद हाऊस येथे झालेल्या हल्ल्यामधून मोशे बचावला होता. सध्या तो इस्रायलमध्ये त्याच्या आजी-आजोबांसोबत राहातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी जेव्हा इस्रायलला भेट दिली तेव्हा त्यांनी मोशेची भेट घेऊन त्याला भारतभेटीचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार आता मोशे भारताच्या भेटीवर येत आहे. तसेच याच भेटीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यानाहू यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते, त्याचा स्वीकार नेत्यानाहू यांनी केला होता. भारताला भेट देणारे नेत्यानाहू हे दुसरे इस्रायली पंतप्रधान ठरतील. यापुर्वी २००३ साली अरायल शेराँन यांनी भारताला भेट दिली होती. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते. दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर तेव्हा चर्चा केली होती. इस्रायल आणि भारत यांच्या संबंधांना तेव्हापासून गती मिळाली होती. यावर्षी भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये राजनयीक संबंध प्रस्थापित होण्याला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. 

भारत-इस्रायल यांच्या संबंधांवर दृष्टीक्षेप१९९२ - दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित१९९७- इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट२०००- उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांची इस्रायलला भेट२००३- इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांची भारतास भेट२००६- तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार, कपिल सिब्बल, कमलनाथ यांची  इस्रायल भेट२०१२- परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची इस्रायलला भेट२०१४- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू यांची न्यू यॉर्कमध्ये भेट. २०१४- टवीटरवर नरेंद्र मोदी यांनी हिब्रूमधून हनुक्का या ज्यू सणाच्या शुभेच्छा दिल्या, त्याला नेत्यानाहूंचा हिंदीतून प्रतिसाद२०१४- गृहमंत्री राजनाथ सिंह यांची इस्रायलला भेट२०१५- इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे यालोन यांची भारत भेट (पंतप्रधानांशीही संवाद)२०१५- भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांची पॅलेस्टाइन आणि इस्रायलला भेट. इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण. असे भाषण देणारे व इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती२०१६- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा इस्रायल दौरा२०१७- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा इस्रायल दौरा, जगभरात चर्चा, विविध करारांवर स्वाक्षर्या        व्यापारी संबंधभारत आणि इस्रायल यांच्यामध्ये शेती, पशुपालन, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यापारी संबंध आहेत. मौल्यवान खडे, तंत्रज्ञान, रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, प्लास्टीक, खते, कपडे, औषधे अशा अनेक वस्तूंची आयात निर्यात हे देश करत असतात. या दोन्ही देशांनी २०१४ साली ४.५२ अब्ज डॉलर्सचा व्यापार (संरक्षण क्षेत्रातील खरेदी-विक्री वगळून) केला आहे. इस्रायलमध्ये तयार होणारे संरक्षण साहित्य खरेदी करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे

टॅग्स :Israelइस्रायलNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत