नऊ महिन्यांत इसिसच्या १० हजार अतिरेक्यांचा खात्मा
By Admin | Updated: June 4, 2015 01:12 IST2015-06-04T00:29:41+5:302015-06-04T01:12:16+5:30
आंतरराष्ट्रीय आघाडीने इस्लामिक स्टेटविरुद्ध (इसिस) सिरिया आणि इराकमध्ये नऊ महिन्यांपूर्वी मोहीम सुरू केल्यापासून या दहशतवादी संघटने

नऊ महिन्यांत इसिसच्या १० हजार अतिरेक्यांचा खात्मा
पॅरिस : आंतरराष्ट्रीय आघाडीने इस्लामिक स्टेटविरुद्ध (इसिस) सिरिया आणि इराकमध्ये नऊ महिन्यांपूर्वी मोहीम सुरू केल्यापासून या दहशतवादी संघटनेचे दहा हजारांहून अधिक सदस्य मारले गेले आहेत, असे अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री अॅन्टोनी ब्लिन्केन यांनी बुधवारी येथे सांगितले. इसिसविरोधी आघाडीच्या पॅरिसमधील बैठकीनंतर ते बोलत होते. इसिसविरोधी मोहिमेस मोठे यश लाभले असले तरी या संघटनेचे सामर्थ्य अद्याप कमी झालेले नाही. ही संघटना आजही नव्या क्षेत्रात संघर्ष छेडू शकते, असे ते म्हणाले.
इसिसविरोधी आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू झाल्यापासून त्यांची मोठी जीवितहानी झाल्याचे आम्ही पाहिले आहे. दहा हजारांहून अधिक सदस्य मारले गेले आहेत, असे बिल्केन यांनी फ्रान्स इंटर रेडिओला सांगितले.