निहालचंदानी घेतली गृहमंत्र्यांची भेट

By Admin | Updated: June 20, 2014 22:14 IST2014-06-20T21:25:05+5:302014-06-20T22:14:41+5:30

भाजपा नेते व केंद्रीय खत आणि रसायन राज्यमंत्री निहालचंद मेघवाल यांनी गृहमंत्री राजनाथसिंग यांची शुक्रवारी भेट घेतली .

Nihalchandani took home minister's visit | निहालचंदानी घेतली गृहमंत्र्यांची भेट

निहालचंदानी घेतली गृहमंत्र्यांची भेट

नवी दिल्ली- बलात्काराच्या आरोपाखाली अडकलेले भाजपा नेते व केंद्रीय खत आणि रसायन राज्यमंत्री निहालचंद मेघवाल यांनी गृहमंत्री राजनाथसिंग यांची शुक्रवारी भेट घेतली . सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार मेघवाल यांनी स्वत:चे निरपराधित्व सिद्ध करावे असे राजनाथसिंग यांनी त्याना सांगितले आहे. मंत्रीमंडळाचे सदस्य असणार्‍या मेघवाल यांच्यावरील बलात्कारासारख्या गंभीर आरोपामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत आले आहेत. पण पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे राजनाथसिंग यांनी मेघवाल यांना सांगितले आहे. मेघवाल यांच्यावरील आरोपांची सत्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी एका मंत्र्याकडे सोपविण्यात आली असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच मेघवाल यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
काँग्रेस राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
राज्यमंत्री निहालचंद मेघवाल यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गुरुवारी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्यानी भाजपा मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली व मेघवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Web Title: Nihalchandani took home minister's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.