नीस हल्ला; आणखी दोन जणांना अटक

By Admin | Updated: July 18, 2016 06:09 IST2016-07-18T06:09:55+5:302016-07-18T06:09:55+5:30

जमावात भरधाव ट्रकखाली ८४ चिरडून ठार मारल्याच्या प्रकरणात फ्रेंच पोलिसांनी एका पुरुषाला आणि स्त्रिला रविवारी अटक केली.

Nice attack; Two more arrested | नीस हल्ला; आणखी दोन जणांना अटक

नीस हल्ला; आणखी दोन जणांना अटक


नीस (फ्रान्स) : जमावात भरधाव ट्रकखाली ८४ चिरडून ठार मारल्याच्या प्रकरणात फ्रेंच पोलिसांनी एका पुरुषाला आणि स्त्रिला रविवारी अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक झाली आहे.
जमावात ट्रक चालविणाऱ्या ट्युनिशयन तरुणाचा या हत्याकांडामागील हेतू आणि त्यासाठीच्या तयारीचा तपशील चौकशी अधिकाऱ्यांनी पुराव्यांची संगती लावल्यानंतर ही अटक करण्यात आली. ट्रक चालविणाऱ्या मोहम्मद लहोऊआएज- बौहलेल (३१) याने हत्याकांडाच्या दोन दिवस आधी नीस बाजुला असलेल्या प्रशस्त जागेची (हत्याकांड घडले ते ठिकाण) पाहणी केली होती. त्याने हा ट्रक भाड्याने घेतला होता. हे हत्याकांड घडविणारा मोहम्मद बौहलेल हा एकटा राहायचा. (वृत्तसंस्था)

Web Title: Nice attack; Two more arrested