शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video: STOP, STOP, STOP...किंचाळत राहिला कंट्रोलर; न्यूयॉर्कमध्ये काही सेकंदात भयानक विमान अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 18:37 IST

हा अपघात रात्री ११:३८ च्या सुमारास झाला. अपघातानंतर अमेरिकेच्या हवाई वाहतूक प्राधिकरण फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) ने, विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली.

सोमवारी रात्री न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर एक मोठा अपघात घडला. याठिकाणी अग्निशमन दलाच्या ट्रकची एअर कॅनडा एक्सप्रेसच्या विमानाशी टक्कर झाली. अपघाताच्या अगदी आधी एअर ट्रॅफिक कंट्रोलर ट्रक चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत वारंवार "STOP, STOP, STOP" असं ओरडत होता. आता या घटनेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

अपघातापूर्वी कंट्रोलरचा इशारा

व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोलर ट्रक चालकाला धावपट्टी ओलांडण्याची परवानगी देताना ऐकू येतो. मात्र, काही सेकंदांनंतर तो घाबरतो आणि वारंवार "STOP, STOP, STOP" असं ओरडतो. मात्र त्यानंतर काही कळण्याच्या आतच जोरदार टक्कर होते. 

विमान आणि ट्रकची टक्कर कशी झाली?

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचा ट्रक दुसऱ्या विमानापर्यंत पोहोचण्यासाठी धावपट्टी ओलांडत होता. त्याच वेळी मॉन्ट्रियलहून येणारे एक CRJ-900 विमान धावपट्टी क्रमांक ४ वर उतरत असताना हे विमान त्या ट्रकला धडकले. हे विमान जॅझ एव्हिएशन कंपनीचे होते. या अपघातात पायलट आणि को-पायलट यांचा मृत्यू झाला तर ट्रकमधील एक अधिकारी आणि एका सैनिकाचे हातपाय मोडले. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

धावपट्टीवर अग्निशमन दलाचा ट्रक का आला?

युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात विचित्र वास आल्यानंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली. याच कारणास्तव अग्निशमन दलाच्या ट्रकला बोलावण्यात आले होते आणि तो विमानाच्या दिशेने जात होता. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडार२४ (Flightradar24) नुसार विमानाची ट्रकशी टक्कर अंदाजे ३९ किमी प्रति तास वेगाने झाली. हा अपघात रात्री ११:३८ च्या सुमारास झाला. अपघातानंतर अमेरिकेच्या हवाई वाहतूक प्राधिकरण फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) ने, विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली.

दरम्यान, अपघातापूर्वीच खराब हवामानामुळे विमानतळावरील उड्डाणांवर परिणाम झाला होता. या घटनेनंतर परिस्थिती आणखी बिघडली आणि अनेक प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. 

English
हिंदी सारांश
Web Title : New York Airport Crash: Controller's frantic 'STOP' before deadly collision.

Web Summary : A fire truck collided with an Air Canada Express plane at LaGuardia Airport. Air traffic control frantically yelled "STOP" before the crash. The pilot, co-pilot died, and others were injured. The truck was responding to an emergency on another plane.
टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाSocial Viralसोशल व्हायरलAccidentअपघात