न्यूयॉर्क : शीख तरुणासह त्याच्या आईला मारहाण
By Admin | Updated: August 10, 2014 03:06 IST2014-08-10T03:06:35+5:302014-08-10T03:06:35+5:30
न्यूयॉर्कमध्ये शीख तरुण आणि त्याच्या आईला अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने मारहाण केली. हल्लेखोर त्यांना ओसामा बिन लादेन असे संबोधत होते.

न्यूयॉर्क : शीख तरुणासह त्याच्या आईला मारहाण
>न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये शीख तरुण आणि त्याच्या आईला अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने मारहाण केली. हल्लेखोर त्यांना ओसामा बिन लादेन असे संबोधत होते.
मी आणि माङया आईवर क्वीन्स भागात सात रोजी रात्री हल्ला झाल्याचे वैद्यकीय शास्त्रज्ञ असलेल्या या शीख युवकाने सांगितले. अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने शीख तरुणाला ओसामा बिन लादेन असे संबोधत तुमच्या देशात निघून जा, असे त्यांना सांगितले.
न्यूझीलंडमध्ये एकाची हत्या
मेलबर्न : न्यूझीलंडमध्ये एका भारतीय वंशाच्या नागरिकाची दोघांनी चाकूने भोसकून हत्या केली. ऑकलंड येथे गुरुवारी ही घटना घडली. या प्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविंदरसिंग असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. देविंदरसिंग व त्यांच्या पत्नी कामावरून परतताना रस्त्यात जेवणासाठी थांबले होते.