शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

न्यूयॉर्क असेंब्लीमध्ये काश्मीर प्रस्ताव पारित; भारताने केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 05:24 IST

भारताने प्रखर विरोध दर्शवीत म्हटले आहे की, लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी जम्मू- काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक व सामाजिक तत्त्वांची चुकीची व्याख्या करण्याचा अतिशय स्वार्थी व चिंताजनक प्रकार आहे.  ​​​​​​​

न्यूयॉर्क : न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीने ५ फेब्रुवारीला काश्मीर अमेरिकी दिवस घोषित करण्याची गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांना विनंती करणारा प्रस्ताव पारित केला आहे. यावर भारताने प्रखर विरोध दर्शवीत म्हटले आहे की, लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी जम्मू- काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक व सामाजिक तत्त्वांची चुकीची व्याख्या करण्याचा अतिशय स्वार्थी व चिंताजनक प्रकार आहे. असेंब्लीचे सदस्य नादर सायेघ व १२ अन्य सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. यात म्हटले आहे की, काश्मिरी समुदायाने अडचणींतून मार्ग काढत कणखरपणाची ओळख दिली. न्यूयॉर्क राज्य विविध सांस्कृतिक, जातीय व धार्मिक ओळख असणाऱ्यांना मान्यता देऊन सर्व काश्मिरी लोकांना धार्मिक, आवागमन व अभिव्यक्ती स्वातंत्र्यतेसह मानवाधिकाराचे समर्थनासाठी प्रयत्नरत आहे.वॉशिंग्टनस्थित भारतीय दूतावासातील एका प्रवक्त्याने या प्रस्तावावर म्हटले आहे की, आम्ही काश्मीर अमेरिकी दिवससंबंधी न्यूयॉर्क असेंब्लीचा प्रस्ताव पाहिला. अमेरिकीप्रमाणेच भारतही एक जिवंत लोकशाहीचा देश आहे व १.३५ अब्ज लोकांचा बहुलवादी लोकाचार ही एक अभिमानाची बाब आहे. जम्मू- काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ते वेगळे केलेच जाऊ शकत नाही.प्रस्तावाशी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर देताना प्रवक्त्याने म्हटले आहे की, आम्ही भारत- अमेरिकेची भागीदारी व विविधतेने नटलेल्या भारतीय समुदायाशी संबंधित सर्व प्रकरणांवर न्यूयॉर्क स्टेटमध्ये निर्वाचित प्रतिनिधींशी संवाद साधू. हा प्रस्ताव ३ फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्क असेंब्लीमध्ये पारित केला होता. त्यात ५ फेब्रुवारी २०२१ रोजी न्यूयॉर्क राज्यात काश्मीर अमेरिकी दिवस घोषित करण्याची मागणी केली आहे. न्यूयॉर्कमधील पाकिस्तानचे महावाणिज्य दूतावासाने या प्रस्तावाबाबत सायेघ व द अमेरिकन अडव्होकसी ग्रुपची प्रशंसा केली आहे.५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या, तसेच जम्मू- काश्मीर व लडाख केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत आहे.