चीनमध्ये नववर्षाच्या पार्टीत चेंगराचेंगरी : ३५ जणांचा मृत्यू, ४२ जखमी
By Admin | Updated: January 1, 2015 05:24 IST2015-01-01T05:24:23+5:302015-01-01T05:24:23+5:30
जगभरात नववर्षाचे स्वागत जल्लोषात होत असतानाच चीनमध्ये नववर्षासाठी जमलेल्या लोकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ जणांचा मृत्यू तर ४२ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

चीनमध्ये नववर्षाच्या पार्टीत चेंगराचेंगरी : ३५ जणांचा मृत्यू, ४२ जखमी
ऑनलाइन लोकमत
शांघाय, दि. १ - जगभरात नववर्षाचे स्वागत जल्लोषात होत असतानाच चीनमध्ये नववर्षासाठी जमलेल्या लोकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ जणांचा मृत्यू तर ४२ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.
शांघाय या ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने ही घटना घडल्याचे चीनच्या सरकारी वृत्तवाहिन्यांकडून सांगण्यात आले आहे. चीनची सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआने दिलेल्या माहितीनूसार, ही घटना शांघायमधील चेन्यी स्क्वेअर या ठिकाणी रात्री स्थानिय वेळेनुसार रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जमलेल्या लोकांमध्ये अचानक पळापळ सुरू झाल्यानं ही दुर्दैवी घटना घडली असून नेमके कोणत्या कारणाने ही पळापळ सुरू झाली हे अद्याप समजले नसले तरी काही जण पाण्यात पडल्याने त्यांना पाण्यातून बाहेर येण्याची पोलिसांनी विनंती करताच काही जणांनी त्या ठिकाणी पळापळ सुरू केल्याचे पोलिसांचे म्हणने आहे. पळापळीने अनेक जण जागीच दगावले तर अनेकांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.