शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 10:08 IST

हा दहशतवादी हल्ला घडवणारे साजिद आणि नवीद अकरम यांनी घरातून बाहेर निघताना दक्षिणी सागरी किनाऱ्यावर मासे पकडायला चाललोय असं सांगितले.

सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर अंदाधुंद गोळीबारात १६ लोकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. हे दोघेही बाप-लेक आहेत. सिडनीच्या बाँडी बीचवर यहूदी धर्माच्या लोकांचा उत्सव सुरू होता. यावेळी ५० वर्षीय साजिद अकरम आणि २४ वर्षीय मुलगा नवीद अकरम यांनी सागरी किनाऱ्यावर उत्सव साजरा करणाऱ्या लोकांवर बेछूट गोळीबार केला. हे दोघेही पाकिस्तानी नागरिक असल्याचं असल्याचं समोर आले आहे.

न्यू साऊथ वेल्स पोलीस आयुक्त मैल लैन्योन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ५० वर्षीय दहशतवाद्याला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे तर २४ वर्षीय दहशतवादी नवीद याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. हे दोघांमध्ये वडील मुलाचे नाते आहे. दहशतवादी नवीद अकरम याच्याजवळ ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समधील ड्रायव्हिंग लायसेंसही होते. या हल्ल्यात १६ लोकांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा दहशतवादी हल्ला घडवणारे साजिद आणि नवीद अकरम यांनी घरातून बाहेर निघताना दक्षिणी सागरी किनाऱ्यावर मासे पकडायला चाललोय असं सांगितले. त्यानंतर या दोघांनी लोकांवर गोळीबार केला.

दहशतवादी नवीदची पार्श्वभूमी समोर आल्यानंतर पोलिसांनी सिडनी येथील त्याच्या घराला घेराव घातला होता. यावेळी मीडियाशी बोलताना नवीदची आई म्हणाली की, माझा मुलगा बेरोजगार होता. रविवारी त्याने कुटुंबाशी शेवटचं बोलणे केले. विकेंडला तो वडिलांसह बाहेर जात असल्याचे सांगितले. तपासात पोलिसांना घटनास्थळावरून संशयित ६ हत्यारे सापडली. साजिदजवळ १० वर्षाचा बंदूक परवाना होता. त्याशिवाय संशयितांच्या कारमध्ये आईडी आणि ISIS चा झेंडाही सापडला आहे. साजिद अकरम हा गन क्लबचा मेंबर होता. राज्यातील कायद्यानुसार त्याच्याकडे फायर आर्म्स लायसेन्स ठेवण्याचा अधिकार होता. या हल्ल्यामागची कारणे शोधली जात आहे.  असंही पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, सिडनीतील बाँडी बीचवर १ हजाराहून अधिक लोक जमले होते. त्यावेळी जाणुनबुजून बंदूकधाऱ्यांनी यहूदी समुदायाला टार्गेट केले असं पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांनी म्हटलं. माझ्या मुलाकडे कुठलेही हत्यार नव्हते. तो बाहेरही जात नव्हता. मित्रांना भेटत नव्हता. केवळ कामाशी मतलब ठेवायचा असं नवीदच्या आईने सांगितले. त्याशिवाय कॅब्रामेटा हायस्कूलमध्ये त्याचे काही मित्र होते परंतु तो जास्त त्यांच्यात मिसळत नव्हता असंही आई म्हणाली. परंतु २०२२ मध्ये अकरमला एका सोशल मीडियात टॅग केले होते. त्यात नवीदने अल मुराद इन्स्टिट्यूटमध्ये कुराणचं शिक्षण पूर्ण केल्याचं दिसून आले. हे इन्स्टिट्यूट हेकेनबर्ग पश्चिमेकडे सिडनीत अरबी आणि कुराणचं शिक्षण देते. आता ही पोस्ट डिलिट करण्यात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sydney Attack: Pakistani Father-Son Duo Behind Bondi Beach Shooting

Web Summary : A father and son, Pakistani nationals Sajid and Navid Akram, perpetrated the Bondi Beach shooting, killing 16. Sajid was killed by police; Navid is hospitalized. The attack targeted a Jewish gathering. Sajid had a gun license; ISIS flags were found.
टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीAustraliaआॅस्ट्रेलिया