शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Facebook युझर्सवर नवा अंकुश, नामवंतांवरील टीका रोखण्यासाठी संरक्षक उपाय; दहा संस्था काळ्या यादीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 9:33 AM

New restrictions on Facebook users: फेसबुकवर नामवंत लोक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर होणारी गलिच्छ टीका रोखण्यासाठी फेसबुकने नवे संरक्षक उपाय जाहीर केले आहेत.

नवी दिल्ली : फेसबुकवर नामवंत लोक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर होणारी गलिच्छ टीका रोखण्यासाठी फेसबुकने नवे संरक्षक उपाय जाहीर केले आहेत. त्यानुसार या व्यक्तींची आक्षेपार्ह स्वरूपातील छायाचित्रे टीकाकारांनी झळकविली किंवा वैयक्तिक आयुष्यावर शिंतोडे उडविणारा मजकूर लिहिला तर तो लगेच काढून टाकला जाणार आहे. फेसबुकने भारताशी संबंधित दहा संस्थांना काळ्या यादीत टाकले असून, त्यामध्ये सनातन संस्थेचा समावेश आहे.जी अकाउंट नियमानुसार संचालित होत नाहीत, ती बंद करण्यात येणार आहेत, असे फेसबुकने म्हटले आहे. लोकांच्या सुरक्षेपेक्षा फेसबुक नफा कमाविण्याला जास्त प्राधान्य देते, असा आरोप या कंपनीच्या माजी कर्मचारी फ्रान्सिस हेगन यांनी केला होता. फ्रान्सिस हेगन यांनी फेसबुकच्या धोरणांसंदर्भातील काही कागदपत्रे उघड केल्याने ही कंपनी अडचणीत आली होती.  काळ्या यादीत ‘सनातन’ही...फेसबुकने सुमारे चार हजार व्यक्ती व संस्थांना काळ्या यादीत टाकले आहे.त्यात सनातन संस्थेसह दहा भारतीय संस्थांचा समावेश आहे. याशिवाय माओवादी कम्युनिस्ट पक्ष, नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड, ऑल त्रिपुरा टायगर फोर्स, कांगलेई कम्युनिस्ट पार्टी, खलिस्तान टायगर फोर्स, पीपल्स रेव्होल्युशनरी पार्टी ऑफ कांगलेईपाक, इंडियन मुजाहिदीन यांचाही यादीत समावेश आहे. अतिरेकी अफजल गुरू, तालिबान व इस्लामिक स्टेट हेही या यादीत आहेत.कायदेशीर कारवाईऐवजी नवे उपाय आता फेसबुक काय निर्णय घेणार, याची सर्वांना उत्सुकता होती. हेगन यांच्या आरोपांना फेसबुक जाहीर उत्तर देणार की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार याकडेही लक्ष होते. मात्र त्या गोष्टी टाळून फेसबुकने नामवंतांवरील गलिच्छ टीका रोखण्यासाठी नवे उपाय जाहीर करण्यावर भर दिला. 

विविध व्यक्तींची बदनामी करण्यासाठी काही लिंक फेसबुकवर पोस्ट केल्या जातात. इतर सोशल मीडियावरील लिंकही देण्यात येतात. अशा लिंक आता फेसबुकवरून काढून टाकण्यात येणार आहेत.  

कोणाही व्यक्तीची फेसबुकवर बदनामी किंवा छळ होऊ नये याची आम्ही दक्षता घेणार आहोत. एखाद्या हिंसक घटनेचा तडाखा बसलेले लोक, सरकारी अधिकारी यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठी, त्यांची बदनामी करण्यासाठी टीकाकार फेसबुकवरील एकाहून जास्त अकाउंटचा वापर करतात. अशी अकाउंट यापुढे बंद केली जाणार आहेत.         - अँटिगोन डेव्हिस,     सुरक्षाविभाग प्रमुख, फेसबुक 

टॅग्स :Facebookफेसबुक