शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

नवीन कल्पनांमुळेच खुला होतो विकासाचा मार्ग... संशोधन करणाऱ्या तीन अर्थतज्ज्ञांना नोबेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:03 IST

नोबेल समितीने सांगितले की, या अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि उत्पादनाच्या नवनवीन पद्धतींमुळेच सतत आर्थिक विकास शक्य होतो. नव्या कल्पना जुन्या पद्धतींना बदलून टाकतात - ही प्रक्रिया कधीही थांबत नाही. 

स्टॉकहोम : यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक अमेरिकेचे जोएल मोकिर तसेच पीटर हॉविट आणि ब्रिटनच्या फिलिप एगियॉन तीन प्रख्यात अर्थतज्ज्ञांना जाहीर करण्यात आले आहे. आर्थिक विकासात ‘इनोव्हेशन’ म्हणजेच नवकल्पनांचा कसा मोठा वाटा असतो, यावरील त्यांच्या अभ्यासासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.नोबेल समितीने सांगितले की, या अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि उत्पादनाच्या नवनवीन पद्धतींमुळेच सतत आर्थिक विकास शक्य होतो. नव्या कल्पना जुन्या पद्धतींना बदलून टाकतात - ही प्रक्रिया कधीही थांबत नाही. जोएल मोकिर(अमेरिका - अर्थशास्त्र आणि इतिहासाचे प्राध्यापक )कार्य : औद्योगिक क्रांती कशी झाली, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कशाप्रकारे आर्थिक विकास घडवला

पीटर हॉविट(अमेरिका - अर्थशास्त्राचे प्राध्यापक) कार्य : आर्थिक विकास, नवकल्पना आणि पॉलिसीवर संशोधन.  ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’ महत्त्वाचे आर्थिक मॉडेल.

फिलिप एगियॉन(अमेरिका - अर्थशास्त्राचे प्राध्यापक)कार्य : आर्थिक विकास, उत्पादन आणि आव्हाने. ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’ हे महत्त्वाचे आर्थिक मॉडेल

आर्थिक विकासाचा धडा...जोएल मोकिर यांनी इतिहासाच्या अभ्यासातून दाखवून दिले की सततचा आर्थिक विकास शक्य होण्यासाठी समाजाने नव्या कल्पनांना स्वीकारण्याची मानसिकता ठेवणे अत्यावश्यक आहे. समाजात ‘नवे विचार स्वीकारण्याची मोकळीक’ हीच विकासाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’चा सिद्धांतफिलिप एगियॉन आणि पीटर हॉविट यांनी १९९२ मध्ये ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’ हे महत्त्वाचा आर्थिक मॉडेल मांडले. याचा अर्थ असा की, नवीन आणि सुधारित उत्पादन बाजारात आले की जुन्या तंत्रज्ञानाच्या कंपन्या मागे पडतात. ही प्रक्रिया रचनात्मक, तर दुसरीकडे विनाशकारी असते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nobel for economists: Innovation unlocks growth, says research.

Web Summary : Three economists won the Nobel Prize for their work on innovation and economic growth. Their research highlights how new ideas and technologies drive progress, emphasizing the importance of embracing change for sustained development through creative destruction.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयNobel Prizeनोबेल पुरस्कार