शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

CoronaVirus News: कोरोना चीनची पाठ सोडेना; संसर्ग वाढल्यानं एकच खळबळ, विमाने रद्द, शाळा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 10:59 AM

CoronaVirus News: कोरोनाचा पुन्हा झालेला उद्रेक पर्यटकांशी संबंधित असल्याने चीनने तातडीने उपरोक्त उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

बीजिंग : सलग पाचव्या दिवशीही कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने चीनने गुरुवारी कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी शेकडो उड्डाणे रद्द केली आहे. यासोबत शाळाही बंद केल्या आहेत. तसेच सामूहिक चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. चीनने सीमा बंदी आणि लक्ष्यित लॉकडाऊन करून कोविड-१९ ची साथ आटोक्यात आणली होती. परंतु, कोरोनाचा पुन्हा झालेला उद्रेक पर्यटकांशी संबंधित असल्याने चीनने तातडीने उपरोक्त उपाययोजना हाती घेतल्या आहेत.चीनच्या उत्तर आणि वायव्य क्षेत्रात नवीन रुग्ण आढळले आहेत. पर्यटकांच्या अनेक गटातील ज्येष्ठ जोडप्यापासून संसर्ग पसरला आहे. पर्यटकांचा हा गट शियान गान्सू प्रांत आणि अंतर्गत मंगोलियाकडे जाण्याआधी शांघायमध्ये होता. त्यांच्या या प्रवासादरम्यान त्यांच्या संपर्कात आल्याने नवीन रुग्ण आढळले.कोरोनाचा नवीन उद्रेक वाढण्याआधीच त्याला आळा घालण्यासाठी हे पाच प्रांत आणि बीजिंगसह या विभागातील स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर चाचण्या सुरू केल्या आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निसर्गरम्य ठिकाणे आणि पर्यटन स्थळे, शाळा तसेच करमणुकीची ठिकाणे बंद केली आहेत. याशिवाय काही निवासी परिसरात लक्ष्यित लॉकडाऊन लागू केला आहे. वायव्य प्रांतातील लोकांना घराबाहेर न पडण्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या