मदिनात नवे विमानतळ सुरू
By Admin | Updated: July 6, 2015 23:09 IST2015-07-06T23:09:55+5:302015-07-06T23:09:55+5:30
वार्षिक हज यात्रेपूर्वी सौदी अरेबियाने मदिना येथे नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केले आहे. १.२ अब्ज अमेरिकी डॉलर खर्चून हे विमानतळ तयार झाले आहे.

मदिनात नवे विमानतळ सुरू
दुबई : वार्षिक हज यात्रेपूर्वी सौदी अरेबियाने मदिना येथे नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केले आहे. १.२ अब्ज अमेरिकी डॉलर खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रिन्स मोहंमद बिन अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सौदीचे राजे सलमान यांच्या हस्ते उद्घाटन झाले. खासगी क्षेत्राकडून उभारणी आणि संचालन होणारे हे देशातील पहिले विमानतळ आहे.
विमानतळाचे पहिल्या टप्प्याचे क्षेत्र ४० लाख चौ. मीटर असून त्यामुळे दरवर्षी ८० लाख प्रवासी हाताळता येणार आहेत.
टप्पा क्रमांक दोन आणि टप्पा क्रमांक तीनच्या विकासानंतर प्रवासी क्षमता (प्रतिवर्ष) अनुक्रमे १८ दशलक्ष व ४० दशलक्षपर्यंत वाढेल. हे अत्यंत अत्याधुनिक असे विमानतळ आहे. (वृत्तसंस्था)
> सौदीतील २७ विमानतळांचे संचालन करणाऱ्या जनरल अॅथॉरिटी आॅफ सिव्हिल अॅव्हिएशनकडेच (जीएसीए) या विमानतळाची मालकी आहे.
> सहा टर्मिनल
या विमानतळावर ६ टर्मिनल असून ते हज टर्मिनलच्या एकदम जवळ आहेत. त्यांचे क्षेत्रफळ १०,००० चौरस मीटर असून आसन क्षमता ४,००० आहे. विमानतळावर प्रवासी व सामान वाहतुकीची अत्याधुनिक व्यवस्था आहे. ३६ इलेव्हेटर्स, २८ एस्कीलेटर्स व २३ कन्व्हेयर बेल्टस्मुळे प्रवासी व सामानाची टर्मिनलमधील वाहतूक अत्यंत वेगाने होते.