शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 10:56 IST

PM Modi Donald Trump News: अमेरिकेचा मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव भारताला मान्य नसल्याचे पंतप्रधान मोदींनी अमेरिकेला सांगितले. मोदी आणि ट्रम्प यांची कॉलवर चर्चा झाली, त्यामुळे त्यांनी हा मुद्दा मांडला. 

PM Modi Donald Trump Latest News : पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी बुधवारी (१८ जून) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. ३५ मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मांडली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कुणीचीही मध्यस्थी भारताने ना कधी स्वीकारली, ना कधी स्वीकारणार, असे मोदी म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी७ शिखर परिषदेसाठी कॅनडाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातच पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बैठक होणार होती. पण, डोनाल्ड ट्रम्प मध्येच दौरा सोडून अमेरिकेत परतले. 

ट्रम्प यांच्याशी मोदींची फोन कॉलवरून चर्चा

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कॉलवरून ३५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाबद्दल भारताची भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाबद्दलही ते बोलले. 

युद्ध थांबवण्यासाठी व्यापाराबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही

पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना सांगितले की, संपूर्ण घटनाक्रमामध्ये कधीही आणि कोणत्याही पातळीवर भारत-अमेरिकेतील व्यापार करार किंवा अमेरिकेकडून भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थ करण्यासंदर्भात चर्चा झाली नाही. तणाव कमी करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातच चर्चा झाली होती. ही चर्चाही पाकिस्तानने आग्रह केल्यानंतर झाली, असे मोदी ट्रम्प यांना म्हणाले. 

काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी नको

पाकव्याप्त काश्मीरचा मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी भारताने कधीही तिसऱ्या देशाला मध्यस्थी करण्याबद्दल विचारले ननाही आणि कधीही अशी मध्यस्थी स्वीकारणार नाही, असे मोदी ट्रम्प यांच्याशी बोलताना म्हणाले. 

वाचा >>"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडून मांडण्यात आलेले मुद्दे समजून घेतले. भारताच्या दहशतवाद विरोधातील लडाईला ट्रम्प यांनी पाठिंबा दिला. भारताचे ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असल्याचेही मोदींनी ट्रम्प यांना सांगितले. 

अमेरिकेत येऊ शकता का?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉलवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांना कॅनडा दौऱ्यावरून परतताना अमेरिकेत येऊ शकता का? अशी विचारले. पण, मोदींनी असमर्थता दर्शवली. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे अमेरिकेत येता येणार नाही, असे मोदी म्हणाले. त्यावर भविष्यात भेटण्याचा प्रयत्न करू असे दोन्ही नेते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पOperation Sindoorऑपरेशन सिंदूरAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान