नेपाळच्या सत्ताभ्रष्ट राजाकडे दहा वर्षांचे वीज बिल थकीत

By Admin | Updated: January 17, 2016 02:02 IST2016-01-17T02:02:22+5:302016-01-17T02:02:22+5:30

नेपाळचे सत्ताभ्रष्ट राजे ज्ञानेंद्र यांनी गेल्या दहा वर्षांपासून विजेचे बिल भरलेले नाही, असे नेपाळी वीज मंडळाने सांगितले.

Nepal's ruling king has been ten years of power bill tired | नेपाळच्या सत्ताभ्रष्ट राजाकडे दहा वर्षांचे वीज बिल थकीत

नेपाळच्या सत्ताभ्रष्ट राजाकडे दहा वर्षांचे वीज बिल थकीत

काठमांडू : नेपाळचे सत्ताभ्रष्ट राजे ज्ञानेंद्र यांनी गेल्या दहा वर्षांपासून विजेचे बिल भरलेले नाही, असे नेपाळी वीज मंडळाने सांगितले.
राजे ज्ञानेंद्र सत्तेत असताना नारायण हिती या राजप्रासादात राहत होते; मात्र सत्ताभ्रष्ट झाल्यापासून ते नागार्जुन राजवाड्यात वास्तव्यास आहेत. तेथे गेल्यापासून त्यांनी वीज बिलच भरलेले नाही, असे वीज प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नेपाळच्या वीज मंडळाचे आॅडिट केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सहायक संचालक मुकुंद मान चित्राकर यांनी सांगितले की, वीज बिलाच्या थकबाकीबाबत नागार्जुन राजप्रासादाशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला; पण तेथील कर्मचाऱ्यांनी याबाबत कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Nepal's ruling king has been ten years of power bill tired