शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळची पुन्हा आगळीक, नव्या नकाशात भारताचे तीन भाग दाखवले आपल्या हद्दीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 15:11 IST

गेल्या का ही दिवसांपासून भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले आहेत. नेपाळने भारताच्या हद्दीतील कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागांवर आपला दावा केला असून, त्याविरोधात भारताकडून संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे.

ठळक मुद्दे. नेपाळ सरकारने आपल्या देशाच्या नव्या राजकीय नकाशातील बदलांसंदर्भातील संविधान संशोधन विधेयक आपल्या संसदेत सादर केले आहे. नेपाळच्या कायदेमंत्री शिवमाया तुंबाहंफे यांनी नव्या नकाशासंदर्भातील विधेयक संसदेत सादर केले नेपाळने या नकाशात भारताच्या कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागांना आपल्या हद्दीत दाखवले आहे.

काठमांडू - गेल्या काही दिवसांपासून भारत आणि नेपाळमध्ये सीमाप्रश्नावरून निर्माण झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. नेपाळ सरकारने आपल्या देशाच्या नव्या राजकीय नकाशातील बदलांसंदर्भातील संविधान संशोधन विधेयक आपल्या संसदेत सादर केले आहे. नेपाळच्या कायदेमंत्री शिवमाया तुंबाहंफे यांनी नव्या नकाशासंदर्भातील विधेयक संसदेत सादर केले आहे. नेपाळने या नकाशात भारताच्या कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागांना आपल्या हद्दीत दाखवले आहे.

गेल्या का ही दिवसांपासून भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले आहेत. नेपाळने भारताच्या हद्दीतील कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागांवर आपला दावा केला असून, त्याविरोधात भारताकडून संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. नेपाळने भारताच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे, असे भारताने म्हटले आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, आम्ही नेपाळ सरकारला आवाहन करतो की, त्यांनी असे बनावट कार्टोग्राफीक  प्रकाशित करू नयेत. तसेच भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि भौगोलिक अखंडतेचा सन्मान करावा.

काही दिवसांपूर्वी नेपाळच्या भूसंसाधन मंत्रालयाने नेपाळचा एक संशोधित नकाशा प्रसिद्ध केला होता. या नकाशाला नेपाळच्या कॅबिनेट सदस्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र भारताने या नकाशाला तत्काळ आक्षेप घेतला होता. ८ मे रोजी भारताने उत्तराखंडमधील लिपुलेख येथून कैलास मानसरोवरकडे जाणाऱ्या रस्ताचे उदघाटन केले होते. त्यानंतर हा रस्ता आपल्या हद्दीत येतो असे सांगत नेपाळने त्याला आक्षेप घेतला होता. तसेच नेपाळचा नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय