शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळला हवेत ६६६ अब्ज रुपये

By admin | Updated: June 19, 2015 23:24 IST

प्रलयंकारी भूकंपाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार्या नेपाळला तब्बल ६६६अब्ज रु पयांची गरज असून त्यासाठी नेपाळने जगाला मदतीसाठी आहे.

संजय पाठक, काठमांडूप्रलयंकारी भूकंपाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार्या नेपाळला तब्बल ६६६अब्ज रु पयांची गरज असून त्यासाठी नेपाळने जगाला मदतीसाठी आहे. यासाठी येत्या २५जूनला नेपाल इथं डोनर्स मीट आयोजित करण्यात आली आहे. विशेष करून जागतिक वारसाअसलेल्या मंदिर आणि वाडे यांच्या नुतनीकरण करण्यासाठी ही मदत वापरण्याचे नियोजन आहे.भूकंपामुळे नेपाळची अपरिमति हानी झाली आहे. भूकंप झाल्यानंतर भारतासह विविध देशांनी सक्र ीय मदतीचा हात दिला तसेच आर्थिक मदत केली असली तरी काठमांडू शिवाय अन्य जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. त्यातून सावरण्यासाठी देणगीदारांची परिषद बोलवण्यात आली असून भारत, चीनसह अन्य महत्वाचे देश आणि संस्था अशा साठ जणांना निमंत्रित करण्यात आले आहे.राष्ट्रीय परिषद सभागृहात होणार्या या परिषदेचे उद्घाटन नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला करणार आहेत. या परिषदेसाठी आता पर्यंत १७ देश आणि संस्थांनी येण्यास मान्यता दिली नसली तरी भारत आणि चीन या आशियातील मोठ्या देशांपैकी अद्याप प्रतिनिधी पाठवण्याबाबत अधिकृतरीत्या काहीच कळवले नसल्याचे वृत्त काठमांडू येथील द रायजिंग नेपाळ या सरकारी वृत्तपत्राने दिले आहे. मात्र भारतातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: किंवा परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज किंवा अरुण जेटली उपस्थित राहण्याची शक्यता याच सरकारी वृत्तपत्राचे पत्रकार तारा बस्याल यांनी दिली आहे.नेपाळला जागतिक वारसा असलेल्या वास्तूंचे शास्रीय पद्धतीने नुतनीकरण करण्याच्या कामांचा यात समावेश आहे. या परिषदेच्या निमित्ताने परिषदेत सहभागी प्रतिनिधींना काही ठिकाणे दाखविण्याचे नियोजन आहे.कर्ज नको अनुदान द्या-नेपाळच्या राष्ट्रीय नियोजन आयोगाने भूकंप पश्चात पुनर्वसनासाठी ६६६ अब्ज रु पयांच्या मदतीचा आराखडा तयार केला आहे. मात्र देणगीदार देशांनी अनुदान द्यावे, कर्ज नको अशी नेपाळची भूमिका सरकारी वत्तपत्र द रायजिंग नेपाळमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. -पुनर्वसनाचे काम पारदर्शी पणे व्हावे यासाठी देशाच्या महालेखापालांची खर्चावर देखरेख राहील असे वित्तमंत्री रमसरन राहत यांनी म्हंटले आहे.