Nepal Prime Minister KP Oli: नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना मोठा झटका; बहुमत सिद्ध करण्यात अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 07:35 PM2021-05-10T19:35:21+5:302021-05-10T19:38:29+5:30

Nepal Prime Minister KP Oli loses trust vote in Parliament : ओली यांना बसला मोठा झटका. नेपाळच्या संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी.

Nepal Prime Minister KP Oli loses trust vote in Parliament | Nepal Prime Minister KP Oli: नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना मोठा झटका; बहुमत सिद्ध करण्यात अपयश

Nepal Prime Minister KP Oli: नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना मोठा झटका; बहुमत सिद्ध करण्यात अपयश

Next
ठळक मुद्देनेपाळच्या संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी.ओली यांना बसला मोठा झटका.

नेपाळचेपंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना मोठा झटका बसला आहे. नेपाळच्या संसदेत प्रतिनिधी सभेत त्यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या ओली यांना हा आणखी एक झटका मानला दात आहे. यापूर्वी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळनं (माओवादी केंद्र) नीत पुष्पकमल दहल गटानं सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर पक्षावर आपली पकड मजबूत करण्यासाठी ओली प्रयत्नशील होती. काही दिवसांपूर्वी भारतासोबत निर्माण केलेल्या संबंधांवरून ओली चर्चेत आले होते. Nepal's Prime Minister K.P. Big blow to Oli Sharma; Failure to prove majority

नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांच्या निर्देशानुसार संसदेच्या खालच्या प्रतिनिधी सदनात विशेष सत्र बोलावण्यात आलं होतं. यावेळी ओली यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. ओली यांच्या बाजूनं ९३ तर विरोधात १२४ जणांनी मतदान केलं. ओली यांना बहुमत जिंकण्यासाठी २७५ सदस्यांच्या सभागृहात १३६ मतांची आवश्यकता होती. 



या विशेष सत्रापूर्वी खासदारांच्या एका गटानं यात भाग न घेण्याचा निर्णयगेतला होता. "२० पेक्षा अधिक खासदारांनी या सत्रावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती पक्षाचे एक नेते भीम रावल यांनी दिली होती. यानंतर ओली यांना आपल्याच पक्षातील काही नेत्यांकडूनही मतं मिळतील याची अपेक्षा नव्हती असं म्हटलं जातं. फेब्रुवारी २०१८ मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळच्या (माओवादी सेंटर) समर्थनानं ओली यांची पंतप्रधानपदी निवड झाली होती. याचे अध्यक्ष पुष्प कमल दहल आहेत. परंतु मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं पक्षाचं विलिनिकरण रद्द केलं होतं.

Web Title: Nepal Prime Minister KP Oli loses trust vote in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.