शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Nepal Plane Crash: पायलटचा थकवा की तांत्रिक बिघाड...नेपाळ विमान अपघाताचे नेमकं कारण काय?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 09:09 IST

Nepal Plane Crash: पाच भारतीयांसह ७२ प्रवासी असलेले नेपाळी प्रवासी विमान रविवारी पोखरा विमानतळावर उतरत असताना दरीत कोसळून ६८ जणांचा मृत्यू झाला.

काठमांडू: पाच भारतीयांसह ७२ प्रवासी असलेले नेपाळी प्रवासी विमान रविवारी पोखरा विमानतळावर उतरत असताना दरीत कोसळून ६९ जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पोखरा विमानतळाचे १५ दिवसांपूर्वीच १ जानेवारीला उद्घाटन झाले होते.

यती एअरलाइन्सच्या एएन-एएनसी एटीआर ७२ विमानाने सकाळी १० वाजून ३३ मिनिटांनी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. अकराच्या सुमारास पोखरा विमानतळावर उतरत असताना जुन्या व नवीन विमानतळाच्या दरम्यान सेती नदीच्या काठावर दरीत कोसळले. १० परदेशी प्रवाशांसह विमानात ६८ प्रवासी आणि चार विमान कर्मचारी होते. रात्री उशिरापर्यंत विमानाच्या ढिगाऱ्याखालून ६९ मृतदेह बाहेर काढण्यात आले.

नेपाळला जाणार्‍या प्रमुख भारतीय एअरलाइन्समधील पायलटने सांगितले की, पायलटच्या थकव्यासह अपघाताची अनेक कारणे असू शकतात. त्यांनी सांगितले की, विमान उडवताना प्रत्येक टप्प्यावर निर्णय घ्यावे लागतात आणि पायलटला चांगली विश्रांती आवश्यकता असते. त्यामुळे, पायलटच्या थकव्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

एटीआर विमानाच्या पायलटने सांगितले की, अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड किंवा पायलटची चूक असू शकते. मात्र, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 ने सांगितले की, हे विमान १५ वर्षे जुने ATR 72-500 आहे. त्याचा नोंदणी क्रमांक 9N-ANC आहे आणि अनुक्रमांक ७५४ असा होता.

बघ्यांची गर्दी, बचावकार्यात अडथळे-

अपघातानंतर पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ रविवारी सर्व येणाऱ्या आणि जाणाया विमानांसाठी बंद केले आहे. आग आटोक्यात आणणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले. अग्निशमन दलाची गाडी दुर्घटना घडली त्या ठिकाणी पोहोचू शकली नाही. अपघातस्थळी गर्दी जमल्याने बचाव कार्यात अडथळे आले.

३० वर्षांत २७ अपघात-

नेपाळमध्ये गेल्या ३० वर्षांमध्ये २७ प्राणघातक विमान अपघात झाले. १९९२ मध्ये दोन मोठे विमान अपघात झाले होते. जुलै महिन्यात थाई एअरलाईन्सच्या विमानाला झालेल्या अपघातात ११३ जणांचा मृत्यू झाला तर सप्टेंबरमध्ये पाकिस्तान एअरलाईन्सचे विमान कोसळून त्यात सर्व १६७ जणांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :NepalनेपाळairplaneविमानDeathमृत्यू