शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Nepal Plane Crash: नेपाळच्या विमान अपघातात 22 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील चौघांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 12:28 IST

Nepal Plane Crash: नेपाळमधील विमान अपघातात भारतीयांमध्ये ठाण्यातील आई-वडील आणि दोन मुलांचा मृत्यू.

Nepal Plane Crash: 4 भारतीयांसह 22 प्रवशांना घेऊन जाणारे विमाननेपाळमध्ये कोसळल्याची घटना घडली होती. आता या अपघातग्रस्तविमानाचे फोटो समोर आले आहेत. मुस्तांग भागातील कोबानमध्ये या विमानाचे अवशेष सापडले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की या विमानाचे तुकडे झाले. दरम्यान, रेस्क्यू टीम आणि नेपाळी मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

या विमानात 4 भारतीय आणि 3 जपानी नागरिकांसह 22 प्रवासी होते. भारतीयांमध्ये ठाण्याच्या चौघांचा समावेश आहे. या विमानाने पोखरा ते जोमसोमसाठी सकाळी 9.55 वाजता उड्डाण घेतले होते. उड्डाण घेतल्याच्या 15 मिनिटानंतर विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर अपघात झाल्याची माहिती समोर आली. स्थानिक लोकांनी नेपाळ लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, विमान मानपती हिमालय भूस्खलनात लामचे नदीच्या मुखाशी कोसळले आहे. नेपाळचे पत्रकार गौरव पोखरेल यांनी या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आहेत.

ठाण्यातील चौघांचा मृत्यू

लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळ लष्कर जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळाकडे जात आहे. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सैन्यदलासह स्थानिक लोकही मदत करत आहेत. अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. अपघातात ज्या भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ते चौघेही महाराष्ट्रातील ठाण्याचे रहिवासी होते.  अशोक कुमार त्रिपाठी, पत्नी वैभवी बांदेकर-त्रिपाठी आणि दोन मुले धनुष आणि रितीका अशी त्यांची नावे आहेत.

टॅग्स :AccidentअपघातairplaneविमानNepalनेपाळthaneठाणे