शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
4
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
5
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
6
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
7
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
8
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
9
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
10
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
11
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
12
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
13
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
14
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
15
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
16
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
17
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
18
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
19
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
20
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस

नेपाळ भूस्खलन, पुरातील बळींची संख्या ११५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 4:06 AM

नेपाळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर व भूस्खलन यात बळी पडलेल्यांची संख्या ११५ वर गेली आहे.

काठमांडू : नेपाळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर व भूस्खलन यात बळी पडलेल्यांची संख्या ११५ वर गेली आहे. तर सुमारे ४० लोक गायब आहेत. या पुरामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत.गेले ३ दिवस नेपाळला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून, त्यामुळे पुराच्या व दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पुरामुळे विस्थापित झालेल्या हजारो लोकांना तात्पुरता आश्रय मिळाला आहे. मात्र त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नसल्याचे ‘काठमांडू पोस्ट’ने म्हटले आहे. निर्मनुष्य भागातून सात मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत पुरामुळे ११५ जणांचा बळी गेला असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. ‘पुरामुळे किती नुकसान झाले, हे निश्चित करण्यासाठी गृहमंत्री जनार्दन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे,’ असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते राम कृष्ण सुबेदी यांनी सांगितले.नेपाळ सरकारने बचाव व मदत कार्याचा वेग वाढवला असून, आपत्तीनंतर मदतीसाठी २७ हजार सुरक्षा रक्षकांना नेमण्यात आले आहे. हरवलेल्यांना शोधण्याचे कार्यही सुरू असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले.१३ हेलिकॉप्टर (त्यात नेपाळ आर्मीच्या हेलिकॉप्टरचाही समावेश आहे) मोटारबोट, रबरबोट इत्यादींद्वारे नागरिकांना मदत पुरविण्यात येत आहे. नेपाळमधील बहुतांश भागातून वाहणाºया राप्ती नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. त्यामुळे नेपाळचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात अनेक विदेशी लोक अडकले आहेत. त्यात ३५ भारतीयांचा समावेश असल्याचे भारतीय दूतावासाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. या पुरामुळे नेपाळमधील २७ जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.