नेपाळ सरकारने भारतासह ३४ देशांची मदत मोहीम गुंडाळली ?
By Admin | Updated: May 4, 2015 16:40 IST2015-05-04T16:28:45+5:302015-05-04T16:40:06+5:30
नेपाळमधील विनाशकारी भूकंपानंतर भारतासह ३४ देशांच्या जवानांनी राबवेली बचाव मोहीम थांबवण्याचे आदेश नेपाळ सरकारने दिल्याचे वृत्त आहे.

नेपाळ सरकारने भारतासह ३४ देशांची मदत मोहीम गुंडाळली ?
ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. ४ - नेपाळमधील विनाशकारी भूकंपानंतर भारतासह ३४ देशांच्या जवानांनी राबवेली बचाव मोहीम थांबवण्याचे आदेश नेपाळ सरकारने दिल्याचे वृत्त आहे. याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी नेपाळमधील खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
नेपाळमध्ये २५ एप्रिलरोजी विनाशकारी भूकंपाचा धक्का बसला व या भूकंपात नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त व प्राणहानी झाली आहे. आत्तापर्यंत सात हजारहून अधिक नागरिकांचा या भूकंपात मृत्यू झाला असून जखमींचा आकडाही १४ हजाराच्यावर पोहोचला आहे. नेपाळमध्ये बचाव व मदतकार्यासाठी भारतासह चीन, युके, नेदरलँड, जपात, तुर्किस्तान अशा ३४ देशांचे पथक तिथे दाखल झाले होते. भारताचे सैन्य, हवाई दलाचे जवानांसोबत एनडीआरएफच्या ५० जवानांच्या १६ तुकड्या तिथे मदतकार्य करत आहेत. पण आता नेपाळ सरकारने या सर्व देशांच्या पथकांना बचावकार्य गुंडाळण्याचे निर्देश दिले आहेत. आता ढिगा-याखालून जीवंत बाहेर पडणा-यांची शक्यता कमी असून बचावकार्याऐवजी आता मदतकार्यावर भर दिले जाईल असे नेपाळमधील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले आहे.