शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

Nepal Aircraft Crash: लँडिंगपूर्वी तरुण करत होता FB लाईव्ह, तेव्हाच विमानाचा अपघात; UP च्या ४ मित्रांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 08:20 IST

Nepal Aircraft Crash: नेपाळमध्ये रविवारी यति एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात झाला. या विमानात ६८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होती. यात ६९ लोकांचे मृतदेह सापडले आहेत.

Nepal Aircraft Crash : नेपाळमधील पोखरा येथे रविवारी एक विमान अपघात झाला. यति एअरलाईन्सचे विमान लँडिंगच्या १० सेकंद आधी क्रॅश झाले. या दुर्घटनेतील आतापर्यंत ६९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. विमानात ६८ प्रवाशांसह ४ क्रू मेंबर्सदेखील होते. विमान अपघातात ५ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. त्यात उत्तर प्रदेशातील गाझीपूरच्या ४ मित्रांचाही समावेश आहे. चौघंही जण तीन दिवसांपूर्वीच नेपाळ फिरण्यासाठी आले होते. 

पोखरामध्ये मृतदेह सापडल्यानंतर त्यांची ओळख पटू शकली, त्यानंतर गाझीपूर प्रशासनाने गावात जाऊन याची खातरजमा केली. ज्या चार जणांचा मृत्यू झाला त्यांच्यापैकी एकाच्या भावाने या घटनेचा व्हिडीओ त्याच्या फेसबुकवर लाइव्ह पाहिल्याचे सांगितले जात आहे. नेपाळमधील चार तरुणांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर गाझीपूरमधील त्यांच्या घरावर शोककळा पसरली आहे.  रविवारी काठमांडूपासून २०५ किमी अंतरावर असलेल्या पोखरामध्ये यति एअरलाइन्सचे ७२ आसनी विमान कोसळले. लँडिंगच्या अवघ्या १० सेकंद आधी विमान एका टेकडीवर आदळले, त्यानंतर विमानाला आग लागली. नेपाळ प्रशासनाने सोनू जैस्वाल, अभिषेक कुशवाह, अनिल कुमार राजभर आणि विशाल शर्मा हे गाझीपूरमधील बरेसर अलावलपूर येथील रहिवासी विमानात होते याची ओळख पटवली आहे. अपघातापूर्वी हे चौघेही फेसबुकवर लाईव्ह होते. त्याचा हा व्हिडीओ फेसबुकवर समोर आला आहे. सोनू जयस्वाल लाइव्ह करत होता. यामध्ये आतील आणि बाहेरील दृश्ये दाखवत असताना विमान कोसळले आणि आगीच्या ज्वालाही व्हिडीओत दिसू लागल्या.गेल्या महिन्यात नेपाळचा प्लॅनसोनू जयस्वालसह चार मित्र अनेक दिवसांपासून बाहेर फिरण्यासाठी जाण्याच्या तयारीत होते, सर्वांनी मिळून गेल्या महिन्यातच नेपाळला जाण्याचा प्लॅन बनवला होता. १३ जानेवारी रोजी चार मित्र कारने मऊ येथे गेले आणि नंतर बसने काठमांडूला पोहोचले. रविवारी काठमांडूहून पोखराला जात असताना विमानाचा अपघात झाला. त्यातच गाझीपूर येथील चार मृतांच्या माहितीवरून येथील प्रशासनात खळबळ उडाली आहे. घाईघाईत पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी गावात पोहोचले आणि त्यांनी गावकऱ्यांकडून माहिती घेतली. कासीमाबादचे एसडीएम आणि तहसीलदार यांनी मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशNepalनेपाळAccidentअपघात