दलाई लामांच्या भेटीमुळे नकारात्मक परिणाम -चीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 01:19 IST2017-04-13T01:19:08+5:302017-04-13T01:19:08+5:30
अरुणाचल प्रदेशला दलाई लामा यांनी दिलेल्या भेटीचे सीमा प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम होतील, असा इशारा चीनने बुधवारी भारताला दिला. तिबेटच्या

दलाई लामांच्या भेटीमुळे नकारात्मक परिणाम -चीन
बीजिंग : अरुणाचल प्रदेशला दलाई लामा यांनी दिलेल्या भेटीचे सीमा प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम होतील, असा इशारा चीनने बुधवारी भारताला दिला. तिबेटच्या प्रश्नावरील बांधिलकीचे भारत उल्लंघन करीत असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला. चीन स्वत:च्या भूप्रदेशाच्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी
‘पुढील कारवाई’ करील, असेही
म्हटले.
दलाई लामा आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांवर चीनने जोरदार टीका केली. खांडू यांनी आमच्या राज्याची सीमा ही तिबेटशी आह,े चीनशी नाही, असे वक्तव्य केले होते. दलाई लामा आणि पेमा खांडू यांनी धार्मिक कार्यक्रमांची मर्यादा ओलांडल्याचे परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते लू कांग म्हणाले. (वृत्तसंस्था)