शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:37 IST

या भीषण नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 1,006 जणांचा बळी गेला आहे. तर 30.2 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पाकिस्तानात 26 जूनपासून मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरांमुळे हाहाकार उडाला आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 1,006 जणांचा बळी गेला आहे. तर 30.2 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 5,768 बचाव मोहिमा राबवण्यात आल्या, यांमध्यये तब्बल 273524 एवढ्या मदतसामग्रीचे वितरण करण्यात आले. महत्वाचे म्हणजे, एनडीएमए, प्रांतीय आपदा व्यवस्थापन प्राधिकरण (PDMA), पाकिस्तान सैन्य आणि इतर आपत्कालीन सेवांच्या अथक प्रयत्नांमुळे 741 छावण्यांमध्ये 6,62,098 लोकांवर उपचार करण्यात आले.

मृत्यू आणि जखमींची आकडेवारी अशी -पाऊस आणि पूर यांमुळे मृत्यू पावलेल्यांचा सर्वाधिक आकडा पंजाबात नोंदवला गेला आहे. मृतांचा विचार करता...- पंजाबमध्ये सर्वाधिक ३०४ मृत्यू नोंदवले गेले आहेत. यांत ११० मुले, १४३ पुरुष आणि ५१ महिलांचा समावेश आहे.- खैबर पख्तूनख्वा मध्ये ५०४ मृत्यू नोंदवले गेले यांत ९० मुले, ३३८ पुरुष, ७६ महिलांचा समावेश आहे.- सिंधमध्ये ८० जणांचा मृत्यू झाला आहे.- बलुचिस्तानात ३० जणांचा मृत्यू नोंदवला गेला तर इस्लामाबादमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे.- याशिवाय पाकिस्तानच्या ताब्यातील गिलगित-बाल्टिस्तान मध्ये ४१ तर जम्मू व काश्मीरमध्ये ३८ जमांचा मृत्यू झाला.

याशिवाय, देशभरात एकूण १,०६३ लोक जखमी झाले आहेत. यात पंजाबमधील ६६१, खैबर पख्तूनख्वामधील २१८, सिंधमधील ८७, गिलगित-बाल्टिस्तानमधील ५२, जम्मू-काश्मीरमधील ३७, बलुचिस्तानमधील ५ आणि इस्लामाबादमधील ३ जणांचा समावेश आहे. 

28.1 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले -महत्वाचे म्हणजे, बचावासाठी सर्वाधिक मोहिमा पंजाब प्रांतात राबवल्या गेल्या. येथे 4,749 मोहिमांद्वारे 28.1 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सिंध प्रांतात 753 मोहिमांद्वारे 1,84,011 लोकांना, तर खैबर पख्तूनख्वामध्ये 211 मोहिमांद्वारे 14,317 लोकांना वाचवण्यात आले. याशिवाय, या आपत्तीत मालमत्ता आणि पायाभूत सुविधांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान जाले आहे. देशभरात 12,569 घरे प्रभावित झाली आहेत, यांपैकी 4,128 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच 6,509 पशुधनाचे नुकसान झाले. सुमारे 239 पूल आणि 1,981 किलोमीटर रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfloodपूरDeathमृत्यू