नासाचे मावेन यान लाल ग्रहाच्या कक्षेमध्ये दाखल
By Admin | Updated: September 23, 2014 06:28 IST2014-09-23T06:25:03+5:302014-09-23T06:28:38+5:30
नासाचे अंतराळ यान मावेनने मंगळ ग्रहाला प्रदक्षिणा घालणे सुरू केले आहे. हे यान लाल ग्रहावरील हवामानात झालेल्या बदलांचा अभ्यास करण्याच्या मोहिमेवर आहे

नासाचे मावेन यान लाल ग्रहाच्या कक्षेमध्ये दाखल
वॉशिंग्टन : नासाचे अंतराळ यान मावेनने मंगळ ग्रहाला प्रदक्षिणा घालणे सुरू केले आहे. हे यान लाल ग्रहावरील हवामानात झालेल्या बदलांचा अभ्यास करण्याच्या मोहिमेवर आहे.
कालचक्रासोबत मंगळ उष्ण, थंड व कोरड्या हवामानाचा ग्रह कसा बनला याचा हे यान शोध घेणार आहे. यान कक्षेत पोहोचताच नासाच्या गोडार्ड स्पेस सेंटरचे डेव्ह फोल्टा म्हणाले की, यानाने केलेल्या प्रवासाच्या आकडेवारीवरून ते आता मंगळ ग्रहाच्या कक्षेत आहे. अभिनंदन!
या मानवरहित यानाने मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचण्यापूर्वी ७,११० लाख किमीचा प्रवास केला आहे. हे यान मंगळ ग्रहाच्या वरच्या हवामानाचा अभ्यास करणारे पहिलेच यान आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी व कार्बन डायक्साइडचे अस्तित्व होते. या पाण्याचे आणि वायूचे नेमके काय झाले हे या यानाद्वारे शास्त्रज्ञांना समजेल. मंगळ ग्रहाच्या हवामानात झालेले बदल संशोधकांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. मावेनद्वारे प्राप्त आकडेवारीवरून भविष्यात मानव या ग्रहावर स्वत:ला कसे जिवंत ठेवू शकतो हे जाणून घेता येऊ शकेल. (वृत्तसंस्था)
मानव २०३० मध्ये या ग्रहावर पाऊल ठेवण्याची शक्यता आहे. मावेनच्या विज्ञान पथकाचे जॉन क्लार्क यांनी सांगितले की, मंगळ हे थंड ठिकाण आहे; परंतु तेथे जास्त हवामान नाही. आमच्या हवामानाच्या निम्मेच हवामान तेथे आहे. मात्र, आम्हाला हे माहीत आहे की, मंगळ बदलू शकतो. कारण, गत काळात तो वेगळा होता. मंगळाच्या पृष्ठभागावर एकेकाळी पाणी होते याचे खूप पुरावे आहेत.