शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
3
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
4
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
5
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
6
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
7
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
8
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
9
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
10
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
11
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
12
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
13
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
14
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
15
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
16
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
17
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
18
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
19
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
20
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या

NASA: नासाने मंगळासारख्या वातावरणात वर्षभर राहण्यासाठी अर्ज मागवले; फक्त याच लोकांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 17:53 IST

NASA Mars news: नासाने सांगितले की, मंगळावर भविष्यातील मिशनमध्ये तेथील प्रत्यक्षातील जीवन आणि आव्हाने पेलण्यासाठी नासा याद्वारे अभ्यास करणार आहे. यामध्ये निवडलेल्या व्य़क्ती कशा प्रकारे या आभासी परिस्थितींमध्ये राहतात हे पाहिले जाणार आहे. 

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) मंगळ ग्रहासारख्या वातावरणात (MARS) साधारण वर्षभर राहण्यासाठी अर्ज मागविले आहेत. नासामंगळ ग्रहावर प्रवाशांना पाठविण्याआठी त्यांना भविष्यातील मिशनच्या वास्तविक आव्हानांसाठी तयार करण्यात येत आहे. (NASA said on Friday that it is seeking a few good men and women to assist in the advancement of its goal of transporting people to Mars by 2037.)

शुक्रवारी नासाने मंगळ ग्रहासारख्या परिस्थिती असलेल्या जागेवर राहण्यासाठी अर्ज मागवले आहेत. साधारण वर्षभर अशा जागी त्यांना रहावे लागणार आहे. चार लोकांची यासाठी निवड केली जाणार आहे. हे लोक 1700 वर्ग फूट जागेमध्ये थ्रीडी प्रिंटरद्वारे बनविलेल्या मार्स ड्यून अल्फामध्ये राहणार आहेत. ही ह्युस्टनच्या जॉन्सन स्पेस सेंटरची इमारत आहे. 

नासाने सांगितले की, मंगळावर भविष्यातील मिशनमध्ये तेथील प्रत्यक्षातील जीवन आणि आव्हाने पेलण्यासाठी नासा याद्वारे अभ्यास करणार आहे. यामध्ये निवडलेल्या व्य़क्ती कशा प्रकारे या आभासी परिस्थितींमध्ये राहतात हे पाहिले जाणार आहे. विशेष म्हणजे मंगळ ग्रहावर जसे वातावरण, धूळ आदी आहे तसेच वातावरण इथे बनविण्यात आले आहे. यामध्ये तशीच आव्हाने तयार करण्यात आली आहेत. उपकरण बिघाड, मर्यादा, संचार आणि अन्य पर्यावरणीय तणावदेखील असणार आहे. यामध्ये निवड झालेले लोक रोबोट, सिम्युलेटेड स्पेसवॉक, नवे तंत्रज्ञान आणि आभासी पर्यावरणाचा अनुभव घेणार आहेत. 

नासा अशा तीन मोहिमा आखणार आहे. यापैकी पहिली मोहिम पुढील वर्षी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर अशी असणार आहे. त्या आधी निवडलेल्या ४ लोकांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. हा अर्ज फक्त अमेरिकी नागरिक करू शकतात. त्य़ांचे वय 30 ते 55 वर्षे असावे. चांगली इंग्रजी, आरोग्य असावे. धूम्रपान करणारा नसावा अशा अटी आहेत.

टॅग्स :NASAनासाMarsमंगळ ग्रह