शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रावर पाठवणार व्हॅक्यूम क्लीनर, सेकंदात नमुने गोळा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 07:35 IST

चंद्रावरील संसाधनांचा शोध घेण्यासाठी आणि भविष्यातील मोहिमांसाठी एलपीव्ही उपयुक्त ठरणार आहे.

न्यूयॉर्क : चंद्राच्या पृष्ठभागावरून माती आणि खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासा चंद्रावर एक अनोखा व्हॅक्यूम क्लीनर पाठवत आहे. त्याला लूनर प्लॅनेटव्हॅक (एलपीव्ही) असे नाव देण्यात आले आहे. हे एलपीव्ही मिशन १५ जानेवारी रोजी लाँच केले जाणार आहे. चंद्रावरील संसाधनांचा शोध घेण्यासाठी आणि भविष्यातील मोहिमांसाठी एलपीव्ही उपयुक्त ठरणार आहे.

ब्लू ओरिजिनची कंपनी हनीबी रोबोटिक्सने विकसित केलेला एलपीव्ही हा हाय-टेक व्हॅक्यूम क्लीनरप्रमाणे काम करेल. चंद्राच्या पृष्ठभागावरून माती आणि खडकांचे नमुने गोळा करण्यासाठीच त्याची खास निर्मिती करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

सेकंदात नमुने गोळा होणारएलपीव्ही काही सेकंदात नमुने गोळा करू शकते. हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील वायूचा वापर करून माती आणि धूळ गोळा करून ती एका कंटेनरमध्ये जमा करेल असे, नासाने सांगितले. 

१४ दिवसांची मोहीम चंद्रावर १४ दिवस ही एलपीव्ही मोहीम चालेल. जर ती मोहीम यशस्वी झाली तर भविष्यातील मोहिमांमध्ये हेच तंत्रज्ञान वापरण्यात येईल.एलपीव्ही चंद्रावरील सूर्यास्ताची दृश्ये देखील कॅप्चर करेल. हे अभियान नासाच्या आर्टेमिस कार्यक्रमाचा एक भाग आहे. ज्याचा उद्देश चंद्रावरून नमुने घेऊन येणे हा आहे. 

यांत्रिक हात नाहीतएलपीव्हीमध्ये कोणतेही यांत्रिक हात नाहीत. हे व्हॅक्यूम क्लिनरसारखे काम करते. चंद्रावरील पाणी, हेलियम आणि इतर महत्त्वाच्या संसाधनांचा शोध घेण्यासाठी नासा या उपकरणाचा वापर करेल, असे नासाच्या मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरमधील शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले. 

बेजोसकडून मस्क यांना आव्हान अंतराळ क्षेत्रातील ‘ब्लू ओरिजिन’ने गुरुवारी ‘न्यू ग्लेन’ उपग्रहाची यशस्वी चाचणी करून उद्योजक इलॉन मस्क यांना आव्हान दिले आहे. या चाचणीच्या माध्यमातून एक प्रोटोटाइप उपग्रह हजारो मैल अंतरावर पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करण्यात आला. पृथ्वीला प्रदक्षिणा घालणाऱ्या अमेरिकन नागरिकाच्या नावावरून या रॉकेटला ‘न्यू ग्लेन’ हे नाव देण्यात आले.

टॅग्स :NASAनासा