Narendra Modis friendship benefit to trump in us election | अमेरिकेच्या निवडणुकीत 'मोदी फॅक्टर' ठरतोय प्रभावी, ट्रम्प यांना होतोय मैत्रीचा फायदा?

अमेरिकेच्या निवडणुकीत 'मोदी फॅक्टर' ठरतोय प्रभावी, ट्रम्प यांना होतोय मैत्रीचा फायदा?

ठळक मुद्देनुकत्याच आलेल्या एका निवडणूक सर्व्हेमध्ये ट्रम्प यांना मोदींबरोबर असलेल्या मैत्रीचा फायदा होतानाही दिसत आहे. ट्रम्प आल्या निवडणूक प्रचारात भारतीय-अमेरिकन समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व्हेनुसार, बिडेन यांच्या तुलनेत ट्रम्प यांना भारतीय अमेरिकन नागरिकांची अधिक मेते मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली/वॉशिंग्टन - अमेरिकेत तीन नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारात कोरोना महामारी, वंशवाद आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यांबरोबरच मोदी फॅक्टरचाही प्रभाव दिसत आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रेटिक पक्षाकडून माजी उपराष्ट्रपती जो बिडेन मैदानात आहेत. ट्रम्प आल्या निवडणूक प्रचारात भारतीय-अमेरिकन समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचा वारंवार परिचय करून देत आहेत.

नवा कायदा; आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

नुकत्याच आलेल्या एका निवडणूक सर्व्हेमध्ये ट्रम्प यांना मोदींबरोबर असलेल्या मैत्रीचा फायदा होतानाही दिसत आहे. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात कार्यरत असलेल्या एका गटाच्या सर्व्हेमध्ये दावा करण्यात आला आहे, की भारतीय अमेरिकन मतदारांचा अधिकांश कल डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे. सर्व्हेनुसार, बिडेन यांच्या तुलनेत ट्रम्प यांना भारतीय अमेरिकन नागरिकांची अधिक मेते मिळण्याची शक्यता आहे. याचे प्रमुख कारण ट्रम्प आणि मोदी यांची मैत्र आहे.

EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट

भारतीय-अमेरिकन नागरिकांचे ट्रम्प यांना समर्थन -
ट्रम्प व्हिक्ट्री इंडियन अमेरिकन फायनान्स कमिटीचे सह-अध्यक्ष अल मेसन यांच्या सर्व्हेनुसार, ज्या भारतीय अमेरिकन मतदारांनी गेल्या निवडणुकीत डेमोक्रेट उमेदवाराला मतदान केले होते, त्यातील किमान 50 टक्के मतदार, यावेळी ट्रम्प यांना साथ देतील. या सर्वेत, भारतीय अमेरिकन नागरिकांची पसंती ट्रम्प यांना असल्यासंदर्भातील 12 मुद्दे सांगण्यात आले आहेत.

आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम

ट्रम्प यांच्याकडे कल असल्याची 12 कारणे - 

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री आणि भारताशी असलेले दृढ संबंध 
 • जागतिक स्तरावर चीनला बाजूला सारण्यास मोदी-ट्रम्प जोडी सक्षम
 • भारताच्या अंतर्गत गोष्टीत दखल न देणे
 • जम्मू-काश्मीर आणि दहशवादासारख्या प्रश्नांवर भारतीच्या बाजूने उभे राहणे
 • भारताचे समर्थन करणे आणि चीनविरोधात लढाई झाल्यास मदतीचे आश्वासन 
 • ट्रम्प नसल्यास चीन भारताविरोधात युद्ध पुकारण्याची शक्यता
 • जागतिक स्तरावर भारताचा दर्जा ऊंचावण्यात ट्रम्प यांचा स्पष्ट दृष्टिकोन
 • चीनच्या विस्तारवादी भूमिकेविरोधत ट्रम्प यांची स्पष्ट नीती  
 • युद्धाऐवजी शांततेच्या मार्गाने वाद सोडविण्यासाठी प्रयत्न करणे. 
 • चीनविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चेबांधणी करणे. 
 • कोविड-19 महामारीच्या आधीपर्यंत अमेरिकेत आर्थिक पुनरुद्धाराचा प्रयत्न 
 • कोरोना महामारीचा योग्य प्रकारे सामना करणे आणि सहकार्य करणे

 

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

English summary :
Narendra Modis friendship benefit to trump in us election.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Narendra Modis friendship benefit to trump in us election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.