शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

PM नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान, ठरले पहिले भारतीय पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 11:03 IST

फ्रान्स देशाकडून सर्वोच्च नागरी सन्मान भुषवण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय आहेत.

पॅरिस - पंतप्रधान नरेंद्र मोदीफ्रान्सच्या २ दिवसीय दौऱ्यावर असून, पॅरिसमध्ये पोहोचले आहेत. यावेळी ते राफेल, पाणबुड्यांवर मोठी संरक्षण डील करणार आहेत. या दौऱ्यापुर्वी मोदींनी फ्रान्सचे वृत्तपत्र लेस इकोसला दिलेल्या मुलाखतीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यतेवर भाष्य केले आहे. त्यामुळे पुन्हा या विषयावरून दोन्ही बाजुने चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, मोदींचे पॅरिसमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागताला भारतीय नागरिकांनीही गर्दी केली होती. तर, फ्रान्सच्या राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर, पंतप्रधान मोदींचा 'लीजन ऑफ ऑनर' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवही करण्यात आला. 

फ्रान्स देशाकडून सर्वोच्च नागरी सन्मान भुषवण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय आहेत. लीजन ऑफ ऑनर हा पुरस्कार जगभरातील काही प्रमुख नेत्यांना आणि प्रतिष्ठीत व्यक्तींनाच प्रदान करण्यात आला आहे. त्यात, दक्षिण आफ्रीकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला, वेल्सचे तत्कालीन राजकुमार किंग चार्ल्स, जर्मनीचे पूर्व चान्सलर अँजेला मर्केल, संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव बुट्रोस बुट्रोस-घाली सब अन्य काहींचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींना आत्तापर्यंत अनेक देशांकडून गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये, आता फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचाही समावेश झाला आहे. 

 

दरम्यान, यापू्र्वी नरेंद्र मोदींना जून २०२३ मध्ये मिस्रद्वारे ऑर्डर ऑफ द नाइल, मे २०२३ मध्ये पापुआ न्यू गिनी देशाकडून कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, मे २०२३ मध्ये कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, मे २०२३ मध्ये पलाऊ गणराज्य द्वारे एबाकल, तर, २०२१ मध्ये भूतानने ड्रुक ग्यालपो, २०२०२ मध्ये अमेरिका सरकारने लीजन ऑफ मेरिट, २०१९ मध्ये बहरीनद्वारे किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां, २०१९ मध्ये मालदीवच्या ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ निशान इज्जुद्दीन, रूसकडून ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू पुरस्कार, २०१९ मध्ये यूएई द्वारा ऑर्डर ऑफ जायद अवॉर्ड, २०१८ मध्ये ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तीन अवॉर्ड, २०१६ मध्ये अफगानिस्तानद्वारे स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह खान आणि २०१६ मध्ये सौदी अरबकडून ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सऊद या पुरस्कारांनी पंतप्रधान मोदींना सन्मानित करण्यात आले आहे.

भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे - मोदी 

फ्रान्समधील वर्तमान पत्रास दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले की, युएनएससीमध्ये अमेरिका, चीन, फ्रान्स, रशिया आणि ब्रिटेन हे स्थायी सदस्य आहेत. भारताला या परिषदेत काही वेळा गैर स्थायी सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या संपूर्ण महाद्वीपांकडे दुर्लक्ष केले जात असताना ती जागतिक संघटनेचा प्राथमिक भाग आहे असे आपण कसे म्हणू शकतो? तसेच सर्वाधिक लोकसंख्येचा देश आणि सर्वात मोठी लोकशाही कायमस्वरूपी सदस्य नसताना ही संस्था जगासाठी बोलते असा दावा कसा करू शकतो? असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFranceफ्रान्सParisपॅरिसIndiaभारत