शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींनी पॅरिसमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष केला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 16:25 IST

फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्याच्या अखेरीस पॅरिसमधील भारतीयांना संबोधित केले.

पॅरिस - फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्याच्या अखेरीस पॅरिसमधील भारतीयांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि फ्रान्समधील संबंध, आपल्या सरकारची कामगिरी यांचा लेखाजोखा मांडतानाच दोन्ही देशांमधील सांस्कृतिक ठेव्याचाही उल्लेख केला. तसेच आठवडाभरावर आलेल्या गणेशोत्सवाचा धागा पकडत पॅरिसमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे कौतुक केले आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला. त्यानंतर उपस्थितांनीही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करण्यास सुरुवात केली.  मोदी म्हणाले की, ''गणेशोत्सव हा पॅरिसमधील सांस्कृतिक कार्यक्रमामधील महत्त्वाचा सण असल्याचे मला सांगण्यात आले. त्या दिवशी पॅरिस शहर जणू छोटा भारतच भासतो. म्हणजेच त्यादिवशी तुम्ही इथेही गणपती बाप्पा मोरया असा जयघोष ऐकू शकता.'' मोदींनी गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करताचा उपस्थित श्रोत्यांमधूनही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष होऊ लागला. 

दरम्यान, आज भारतीय समुदायाला संबोधित मोदींनी आपल्या सरकारने केल्या कामगिरीचा लेखाजोखा मोदींनी उपस्थितांसमोर मांडला. तसेच आता या देशात टेम्पररी असे काही राहिलेले नाही. जे टेम्पररी होते ते आम्ही काढून टाकले आहे, आता स्थायी व्यवस्थेच्या दिशेने देश निघाला आहे, असे सांगत मोदींनी कलम 370 हटवण्याच्या सरकारच्या कामगिरीचा उल्लेख केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी घराणेशाही आणि भ्रष्टाचारावरही हल्लाबोल केला. नवा स्वप्नांचा भारत आता नव्या प्रवासाला निघाला आहे, असेही मोदींनी सांगितले. मोदी म्हणाले, भारतात आता टेम्पररी व्यवस्थेला स्थान नाही. तुम्ही पाहिले असेल की 125 कोटी लोकांचा देश, गांधी आणि बुद्धांची भूमी, राम-कृष्णाच्या भूमीवरून टेम्पररीला काढता काढता 70 वर्षे निघून गेली. टेम्पररी गोष्ट घालवण्यासाठी 70 वर्षे, मला तर हसावे की रडावे हेच कळेनासे झाले होते,'' असा टोला त्यांनी कलम 370 वरून लगावला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतFranceफ्रान्सGaneshotsavगणेशोत्सव