शहरं
Join us  
Trending Stories
1
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
2
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
3
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
4
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
5
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
6
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
7
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
8
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
9
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
10
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
11
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
12
"ऐकून खरंच खूप दुःख होतं की...", पुण्यात होणाऱ्या मतदानाआधी प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत
13
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
14
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
15
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
16
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
17
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
18
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
19
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
20
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर

चीनच्या धमक्यांमध्ये नॅन्सी पेलोसी पोहोचल्या तैवानला, 22 विमानांनी केले एस्कॉर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 9:20 PM

Nancy Pelosi Taiwan Visit : नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशारा त्यांच्या भेटीबाबत चीनने अमेरिकेला दिला आहे.

चीनच्या धमक्यांमध्ये अमेरिकेच्या (America) हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) तैवानमध्ये (Taiwan) पोहोचल्या आहेत. विमानतळावर तैवानच्या राष्ट्रपतींनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, तैवानला येताना 22 विमानांनी नॅन्सी पेलोसी यांना एस्कॉर्ट केले होते. नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशारा त्यांच्या भेटीबाबत चीनने अमेरिकेला दिला आहे. या धमक्यांना न जुमानता, स्पीकर नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्या आहेत.

जपानी मीडियाच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या दौऱ्यापूर्वी 8 अमेरिकन लढाऊ विमाने आणि 5 इंधन भरणारी विमाने अमेरिकन लष्करी तळावरून उड्डाण केले होते. हे नॅन्सी पेलोसी यांच्या विमानाला पॅरामीटर संरक्षण देत होते. दरम्यान, नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर चीनचा थयथयाट झाला आहे. चीनने तैवानवर सायबर हल्ला चढवल्याचे म्हटले जाते. तैवान सरकारची अधिकृत वेबसाइट डाऊन झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, चीनने तैवान सरकारची वेबसाइट हॅक केली आहे. तैवान सरकारच्या वेबसाइटवर गेल्यास सध्या 502 Server Error असा मेसेज येत आहे. इतकेच नाही तर तैवान सरकारच्या राष्ट्रपती कार्यालयाच्या वेबसाइटवरही सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामागे चीनचाच हात असल्याचे सांगितले जात आहे. 

कडेकोट सुरक्षामंगळवारी तैपेई शहरातील ग्रँड हयात हॉटेलसमोर सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. अमेरिकेच्या हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी या हॉटेलमध्ये राहणार आहेत. अमेरिकेच्या हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी आणि त्यांचे सोबतचे शिष्टमंडळ मंगळवारी संध्याकाळी तैवानला पोहोचले असून रात्रभर याठिकाणी मुक्काम करतील. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी कोणतीही माहिती उघड करण्यास किंवा नॅन्सी पेलोसी तैवानला भेट देणार आहेत की नाही यावर टिप्पणी करण्यास नकार दिला होता.

अमेरिकेला चीनचा इशाराअमेरिकेने जर तैवानमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम भोगावे लागतील असा उघड इशारा चीनने दिला आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्यामुळे शांती भंग होईन आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण होईल असाही इशारा चीनने दिला आहे. चीनच्या इशाऱ्याला झुगारून नॅन्सी पेलोसी यांचा दौरा आज होत आहे. त्यामुळे येत्या काळात चीन आणि तैवान यांच्यात युद्ध परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Americaअमेरिकाchinaचीन