संपत्ती केली कुत्र्याच्या नावे

By Admin | Updated: May 20, 2017 03:33 IST2017-05-20T03:33:47+5:302017-05-20T03:33:47+5:30

अमेरिकेत ६० वर्षांच्या एका महिलेने दागदागिने आणि घरासह सुमारे दहा लाख डॉलरची (जवळपास सहा कोटी रुपये) संपत्ती आपल्या पाळीव श्वानाच्या नावे केली आहे.

The names of the dogs made of wealth | संपत्ती केली कुत्र्याच्या नावे

संपत्ती केली कुत्र्याच्या नावे

न्यूयॉर्क : अमेरिकेत ६० वर्षांच्या एका महिलेने दागदागिने आणि घरासह सुमारे दहा लाख डॉलरची (जवळपास सहा कोटी रुपये) संपत्ती आपल्या पाळीव श्वानाच्या नावे केली आहे. न्यूयॉर्क येथील रहिवासी एन. बोल्सनी यांनी आपली सर्व संपत्ती माल्टीज टेरियर प्रजातीचा श्वान बेला मियाच्या नावे केली आहे. आम्ही त्याला भव्य जीवन देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्याच्यावर खूप प्रेम करतो. त्याने केवळ तीन वर्षांच्या काळात एवढे काही केले आहे जे करण्यासाठी बहुतांश लोकांना संपूर्ण हयात लागते, असे त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले. बोल्सनी यांना लईस (३८) आणि रॉबर्ट (३२) अशी दोन मुले आहेत. आपल्या निर्णयाबाबत त्यांची काहीही तक्रार नाही. माझी मुले मोठी झाली असून, यशस्वी आहेत. त्यांना माझ्या पैशांची गरज नाही, असे बोल्सनी यांनी म्हटले.

Web Title: The names of the dogs made of wealth