नाव दुर्घटनेतील बळींची संख्या ७०
By Admin | Updated: February 23, 2015 23:00 IST2015-02-23T23:00:56+5:302015-02-23T23:00:56+5:30
बचाव पथकांनी पद्मा नदीतून आणखी काही मृतदेह बाहेर काढल्यामुळे बांगलादेश नाव दुर्घटनेतील बळींची संख्या सोमवारी वाढून ७० झाली.

नाव दुर्घटनेतील बळींची संख्या ७०
ढाका : बचाव पथकांनी पद्मा नदीतून आणखी काही मृतदेह बाहेर काढल्यामुळे बांगलादेश नाव दुर्घटनेतील बळींची संख्या सोमवारी वाढून ७० झाली. १५० प्रवासी असलेली एमव्ही मुस्तफा ही नाव मालवाहू जहाजाला धडकून काल पद्मा नदीत बुडाली होती. या नावेत क्षमतेहून अधिक प्रवासी होते.
‘बुडालेली नाव पाण्याबाहेर काढण्यात आली असल्यामुळे आम्ही आता मुख्य बचाव मोहीम थांबवत आहोत; मात्र मृतदेह शोधण्याचे काम आणखी काही दिवस सुरूच राहील, असे माणिकगंज जिल्ह्याच्या उपायुक्त रशिदा फिरदौस यांनी सांगितले. बुडालेली नाव बचाव जहाजावरील क्रेनच्या मदतीने सोमवारी सकाळी पाण्याबाहेर काढण्यात आली. तेव्हा नावेत आणखी २४ मृतदेह आढळून आले.
(वृत्तसंस्था)