विवाहबाहय संबंधातून अमेरिकेत मायलेकाची हत्या ?

By Admin | Updated: March 25, 2017 10:49 IST2017-03-25T10:34:36+5:302017-03-25T10:49:23+5:30

शशिकला आणि अनिशला तीक्ष्ण हत्याराने अनेकवेळा भोसकल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

Myelica murdered in America from extramarital affairs? | विवाहबाहय संबंधातून अमेरिकेत मायलेकाची हत्या ?

विवाहबाहय संबंधातून अमेरिकेत मायलेकाची हत्या ?

 ऑनलाइन लोकमत 

न्यूजर्सी, दि. 25 - अमेरिकेत राहणारी भारतीय महिला नारा शशिकला आणि तिचा सात वर्षांचा मुलगा अनिश साई यांची हत्या वर्णव्देषातून झाली नसल्याचे अमेरिकन पोलिसांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील न्यूजर्सी येथील राहात्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी शशिकला आणि अनिशचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात सापडला. दोघांची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. न्यूजर्सी पोलिस सर्व अंगांनी या घटनेचा तपास करत असून, दरोडयाच्या प्रयत्नातून ही हत्या झाली असावी असाही पोलिसांचा संशय आहे. 
 
उत्तर अमेरिकेतील तेलगु संघटना आणि शशिकलाच्या आई-वडिलांनी तिच्या नव-यावर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी प्रमुख संशयित म्हणून नव-याची चौकशी करावी अशी त्यांची मागणी आहे. शशिकलाचे पती हनुमंत राव गुरुवारी संध्याकाळी घरी परतले तेव्हा त्यांना पत्नी आणि मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात पडलेला दिसला. त्यांनी लगेच पोलिसांना ही माहिती कळवली. न्यूजर्सी पोलिसांनी हनुमंत राव यांचा मोबाईल फोन ताब्यात घेतला असून त्यांची चौकशी सुरु आहे. 
 
या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. मारेक-याने शशिकला आणि अनिशला तीक्ष्ण हत्याराने अनेकवेळा भोसकल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. सध्या तरी या हत्यांमागे हेट क्राईम म्हणजे वर्णव्देष कारण नसल्याचे दिसत आहे असे पोलिसांनी सांगितले. शशिकलाचे वडिल सनकारा वेंकटेश्वर राव यांनी हनुमंत राववर थेट आरोप केला आहे. 
 
माझ्या जावयाचे दुस-या एका स्त्रीबरोबर अनेक वर्षांपासून विवाहबाहय संबंध होते. मुलगा आणि पत्नीपासून सुटका करुन घेण्यासाठी त्यानेच ही हत्या केली आहे असा आरोप त्यांनी केला.  सनकारा वेंकटेश्वर राव निवृत्त शिक्षक आहेत. अलीकडच्या काही दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर भारतीयांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे या हत्यासुद्धा वर्णव्देषातून झाल्याची चर्चा आहे. 

Web Title: Myelica murdered in America from extramarital affairs?