शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 20:36 IST

कॅनडात राहणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी थेट संबंध असल्याची कबुली दिली आहे.

India-Canada Relation : भारत आणि कॅनडामध्ये सध्या सुरू असलेल्या तणावादरम्यान खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannun) याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांच्याशी थेट संबंध असल्याची कबुली दिली आहे. पन्नू याने दावा केला की, गेल्या तीन वर्षांपासून तो ट्रूडोशी थेट संपर्कात आहे आणि त्यानेच भारताविरोधातील माहिती पुरवली, ज्या आधारे ट्रूडो यांनी कारवाई केली.

पन्नूने कॅनडातील सीबीसी न्यूजशी बोलताना तीन वर्षांपासून पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी थेट संबंध असल्याची कबुली दिली आहे. यासोबतच भारताविरोधात माहिती दिल्याचेही सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी खलिस्तानी समर्थक निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले. या हत्येप्रकरणी कॅनडा सतत भारतावर गंभीर आरोप करत आहे. 

पन्नू काय म्हणाला?दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसचा प्रमुख पन्नू म्हणाला की, "पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे विधान न्याय, कायद्याचे राज्य आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी कॅनडाची वचनबद्धता दर्शवते. शिख फॉर जस्टिस गेल्या 3 वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयासोबत जवळून काम करत आहे आणि त्यांना सातत्याने गुप्तचर नेटवर्कची माहिती पुरवत आहे. आमच्या संस्थेने कॅनडा पीएमओला सांगितले होते की, भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा आणि त्यांचे सहकारी हरदीप सिंग निज्जरची हत्या करणाऱ्या भारतीय एजंटना रसद आणि गुप्तचर माहिती पुरवत आहेत."

पन्नू पुढे म्हणाला, "आम्ही आमच्या गुरुंच्या आशीर्वादाने आयुष्य जगत आहोत. आपला जन्म ज्या दिवशी होतो, त्याच दिवशी मृत्यूची तारीख लिहिली जाते. त्यामुळे मी भारताकडून येणा-या हत्येच्या धमक्या किंवा भारत सरकारकडून माझ्याविरुद्ध रचल्या जाणाऱ्या कट-कारस्थानाला घाबरत नाही. पण, शेवटी मी जिवंत असेल, तेव्हाच खलिस्तानी मोहीम राबवू शकेन. त्यामुळे मी स्वत:ला सुरक्षित ठेवता यावे आणि जगभरात खलिस्तानी मोहीम सुरू ठेवता यावी यासाठी सर्व सुरक्षा उपाय करत आहे," असेही तो यावेळी म्हणाला.

भारताची कॅनडावर कारवाई निज्जरच्या हत्येमध्ये भारताची भूमिका असल्याचा आरोप कॅनडा करत आहे, त्यामुळेच दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. अशातच, 14 ऑक्टोबर रोजी भारताने कॅनडामधील उच्चायुक्त संजय वर्मा आणि इतर अदिकाऱ्यांना परत बोलावल्याने संबंध अधिक बिघडले. निज्जरच्या हत्येच्या तपासात वर्मा आणि इतर उच्चायुक्तांचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. विशेष म्हणजे, भारतानेही सहा कॅनेडियन उच्चायुक्तांची हकालपट्टी केली आहे. 

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडा