'प्ले बॉय'मॅगझिनमध्ये प्रथमच झळकणार हिजाब घातलेली मुस्लिम तरुणी
By Admin | Updated: September 28, 2016 16:11 IST2016-09-28T15:45:52+5:302016-09-28T16:11:30+5:30
प्ले बॉय या प्रसिद्ध मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच हिजाब परिधान केलेली पहिली मुस्लिम तरुणी दिसणार आहे. अमेरिकन पत्रकार नूर टगौरीचा हा फोटो असून ऑक्टोबरमध्ये या मॅगझिनचा अंक प्रसिद्ध होणार आहे.

'प्ले बॉय'मॅगझिनमध्ये प्रथमच झळकणार हिजाब घातलेली मुस्लिम तरुणी
ऑनलाइन लोकमत
लॉस एंजलिस, दि. २८ - नग्नता आणि उत्तान मादकतेला छायाचित्रणाच्या माध्यमातून जगभरात लोकप्रियता मिळवून देणा-या
'प्ले बॉय' या प्रसिद्ध मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच 'हिजाब' परिधान केलेली मुस्लिम तरूणी दिसणार आहे.
नूर टॅगौरी, असे तिचे नाव असून ती ' न्यूझी' ( Newsy) या व्हिडीओ न्यूज नेटवर्कसाठी पत्रकार म्हणून काम करते. येत्या ऑ़क्टोबरमध्ये प्रसिद्ध होणा-या अंकात नूरचे फोटो झळकणार आहेत. मॅगझिनमध्ये नूर काळे लेदर जॅकेट, जिन्स, स्निकर्स आणि हिजाब अशा वेशात दिसत आहे. तिच्या या धाडसी भूमिकेचे कौतुक होत असले तरी काहींनी तिची ही कृती योग्य नसल्याचे सांगत तिच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
' ज्या पुरुष व महिलांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आयुष्य झोकून दिले अशा काही निवडक व्यक्तींचा' प्ले-बॉय मॅगझिनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
एखाद्याचे व्यक्तीस्वातंत्र्य त्याच्या वेशाच्या पलीकडे येऊ नये असे विचार असणा-या 22 वर्षीय नूरने ' अमेरिकन टेलिव्हिजन'वर पहिली ' हिजाब' (परिधान केलेली) अँकर बनण्याचे स्वप्न पाहिले आहे.
2012 मध्ये सोशल मीडियावरील #LetNoorShine कॅम्पेनमुळे नूर प्रसिद्धी झोतात आली. सोशल मीडियावर तिचे एक लाखांपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.
Behind the scenes #Vlog of the announcement at 9AM with @Playboy!✌