शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्या डॉजमधून मस्क यांची अचानक एक्झिट; राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार पद सोडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 08:37 IST

मस्क यांच्या कसेही निर्णय घेण्यामुळे लाखो अमेरिकन लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. तसेच टेरिफ वॉर असेल किंवा अन्य काही निर्णय यात मस्क यांचा वाटा जास्त होता. यामुळे अमेरिकन लोकांमध्ये मस्क यांच्याविरोधात तीव्र नाराजी होती.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेच्या आर्थिक सुधारणेसाठी उलटसुलट निर्णय घेणारे, ट्रम्प यांच्या खास डॉज समितीचे अध्यक्ष अब्जाधीश एलन मस्क यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ट्रम्प यांच्या सल्लागाराचे पद सोडत असल्याचे मस्क यांनी जाहीर केले आहे. 

मस्क यांच्या कसेही निर्णय घेण्यामुळे लाखो अमेरिकन लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. तसेच टेरिफ वॉर असेल किंवा अन्य काही निर्णय यात मस्क यांचा वाटा जास्त होता. यामुळे अमेरिकन लोकांमध्ये मस्क यांच्याविरोधात तीव्र नाराजी होती. मस्क यांच्या कंपनीच्या कारची विक्री मंदावली होती, तसेच ज्या लोकांनी गाड्या घेतल्या आहेत त्यांच्या गाड्यांना संतापलेले लोक नुकसान करत होते. यामुळे या मालकांना आम्ही मस्क यांचे डोके ठिकाणावर होते, तेव्हा गाडी घेतलेली असे स्टीकर लावावे लागत होते. 

अमेरिकन सरकारमधील विशेष कर्मचारी म्हणून माझा कार्यकाळ संपत आला आहे. सरकारचा अनावश्यक खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानतो. DOGE चे ध्येय काळानुसार अधिक मजबूत होईल, असे मस्क यांनी म्हटले आहे. या एक्झिटमागे कारण काही वेगळेच असल्याचे सांगितले जात आहे. 

DOGE चे काम पाहिल्यामुळे मस्क यांना त्यांच्या व्यवसायावर लक्ष देता येत नव्हते. मस्क हे ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल बिलावर नाराज असल्याचेही सांगितले जात होते. मला वाटते की बिल मोठे असू शकते किंवा ते उत्कृष्ट असू शकते. परंतु मला वाटत नाही की ते एकाच वेळी दोन्ही असू शकेल, असे मस्क यांनी म्हटले होते. यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मस्क यांनी १३० दिवस अमेरिकन सरकारमध्ये विशेष कर्मचारी म्हणून काम केले.या काळात टेस्लाला खूप मोठा फटका बसला आहे. विक्री गडगडलेली असताना शेअर्सही कोसळलेले आहेत. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका