मुशर्रफ बरळले, म्हणे काश्मीरमधील लोकांना भडकवण्याची गरज
By Admin | Updated: October 16, 2014 18:08 IST2014-10-16T18:08:12+5:302014-10-16T18:08:12+5:30
जम्मू काश्मीरमधील जनतेला भडकवण्याची गरज असून पाकिस्तानमधीलही लाखो लोकं काश्मीरमध्ये लढण्यासाठी तयार आहे असे प्रक्षोभक विधान पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी केले आहे.

मुशर्रफ बरळले, म्हणे काश्मीरमधील लोकांना भडकवण्याची गरज
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १६ - जम्मू काश्मीरमधील जनतेला भडकवण्याची गरज असून पाकिस्तानमधीलही लाखो लोकं काश्मीरमध्ये लढण्यासाठी तयार आहे असे प्रक्षोभक विधान पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिम विरोधी व पाकविरोधी असल्याने त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये कायद्याच्या कचाट्यात अडकलेले परवेझ मुशर्रफ यांनी पाकमधील वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा भारतविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तान एक छोटे राष्ट्र असल्यासारखे भारत वागत असून त्यांनी हा गैरसमज कायम ठेऊ नये. कोणीही आमच्या एका गालावर मारल्यावर आम्ही दुसरा गाल पुढे करण्यावर विश्वास ठेवत नाही. तर 'ईट का जवाब पत्थर से' या उक्तीचे आम्ही पालन करतो असे विधान मुशर्रफ यांनी केले आहे.
काश्मीरविषयी विचारले असता मुशर्रफ म्हणाले, आम्ही काश्मीरमध्ये समोरुन व छुप्या अशा दोन्ही पद्धतीने भारतीय सैन्याविरोधात युद्ध करु शखतो. भारतीय सैन्याविरोधात आमच्याकडे सैन्यासोबतच 'दुसरे सोर्स'ही आहेत. काश्मीरमधील जनतेची फक्त माथी फिरवायची गरज आहे व पाकमधूनही लाखो लोकं काश्मीरसाठी लढायला तयार असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. मुशर्रफ यांच्या विधानावर भाजप नेते म्हणाले, मुशर्रफ यांना त्यांच्या देशातच कोणीही विचारत नसून आपणही त्यांचे विधान गांभीर्याने घ्यायची गरज नाही.