मुशर्रफ देशाबाहेर जाऊ शकणार!
By Admin | Updated: June 13, 2014 03:53 IST2014-06-13T03:53:44+5:302014-06-13T03:53:44+5:30
देशद्रोह आणि इतर गंभीर आरोपांचा सामना करत असलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना अखेर १४ महिन्यांनंतर देशाबाहेर जाण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

मुशर्रफ देशाबाहेर जाऊ शकणार!
कराची : देशद्रोह आणि इतर गंभीर आरोपांचा सामना करत असलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना अखेर १४ महिन्यांनंतर देशाबाहेर जाण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका न्यायालयाने त्यांच्यावरील प्रवासबंदी उठविण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.
सरकारी वकिलाच्या अनुपस्थितीत सिंध उच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे पडद्यामागे गुपचूप समझोता झाल्याच्या चर्चांना तोंड फुटले आहे. चार वर्षांच्या विजनवासानंतर मुशर्रफ गेल्यावर्षी मायदेशी परतले होते. मुशर्रफांविरुद्ध अनेक खटले सुरू असल्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून देशाबाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. मुशर्रफ यांनी सिंध उच्च न्यायालयात याचिका करून प्रवास बंदी हटविण्याची मागणी केली होती. (वृत्तसंस्था)