चुलत भावाबरोबर लग्नाला नकार दिला म्हणून महिलेची हत्या
By Admin | Updated: March 17, 2016 13:17 IST2016-03-17T13:17:33+5:302016-03-17T13:17:33+5:30
चुलत भावाबरोबर लग्न करायला नकार दिला म्हणून कुर्दीश महिलेची डोक्यात गोळया घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली.

चुलत भावाबरोबर लग्नाला नकार दिला म्हणून महिलेची हत्या
ऑनलाइन लोकमत
बर्लिन, दि. १७ - चुलत भावाबरोबर लग्न करायला नकार दिला म्हणून कुर्दीश महिलेची डोक्यात गोळया घालून हत्या करण्यात आल्याची घटना जर्मनीमध्ये घडली. या मुलीचा पिता असल्याचा दावा करणा-या व्यक्तीने या घटनेचे फोटो फेसबुकवर अपलोड केले आहेत.
या फोटोमधील दुश्यानुसार ही मुलगी रक्ताच्या थारोळयात पडली असून, तिच्या आजूबाजूला विवाहासाठी आलेले नातेवाईक उभे आहेत. या फोटोसोबतच्या संदेशामध्ये विवाहासाठी नकार दिला म्हणून नवरदेव असलेल्या चुलतभावानेच हत्या केल्याचे म्हटले आहे.
आरोपीने मुलीच्या डोक्यात तीन गोळया झाडून तिची हत्या केली. 'बिल्ड' या जर्मन प्रसिद्धीमाध्यमानुसार आठवडयाच्या सुरुवातीला या महिलेची हत्या झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, पोलिस या हत्येचा तपास करत आहेत. हत्या करण्यासाठी वापरलेली बंदुक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पण आरोपी अजून फरार आहे.