शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 17:07 IST

MRI Machine Accident: आजाराचं निदान करण्यासाठी रुग्णांचं एमआरआय स्कॅन केलं जातं. मात्र हीच एमआरआय स्कॅन करणारी मशीन एका व्यक्तीसाठी जीवघेणी ठरली आहे. अमेरिकेतील लाँग आयलँड येथे एमआरआय मशीनमध्ये खेचले गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एका छोट्याशा चुकीमुळे ही व्यक्ती एमआरआय मशीमध्ये जाऊन अडकली. तसेच तिथेच तडफडून तिचा मृत्यू झाला.

आजाराचं निदान करण्यासाठी रुग्णांचं एमआरआय स्कॅन केलं जातं. मात्र हीच एमआरआय स्कॅन करणारी मशीन एका व्यक्तीसाठी जीवघेणी ठरली आहे. अमेरिकेतील लाँग आयलँड येथे एमआरआय मशीनमध्ये खेचले गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एका छोट्याशा चुकीमुळे ही व्यक्ती एमआरआय मशीमध्ये जाऊन अडकली. तसेच तिथेच तडफडून तिचा मृत्यू झाला.

याबाबत काही पाश्चात्य वृत्तसंस्थांमधून मिळालेल्या अधिक माहितीनुसार ६१ वर्षीय कीथ मॅकएलिस्टर हे वेबस्टरी येथील नासाऊमध्ये एका ओपन एमआरआय मशीनमध्ये अडकले. तसेच गंभीररीत्या जखमी झाले. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचे अनेक झटके येऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गळ्यात घातलेली धातूची माळा त्यांच्यांसाठी जीवघेणी ठरण्याची प्राथमिक माहिती आहे. ही माळा घालून ते एमआरआय मशीनजवळ गेले होते. तेव्हा मशीनमधील शक्तिशाली लोहचुंबकांनी त्यांना आत खेचून घेतले.

कीथ यांची पत्नी एड्रियन जोन्स-मॅकलिस्टर यांनी सांगितले की, मी माझ्या गुडघ्याचं एमआरआय स्कॅन करण्यासाठी आले होते. एमआरआय केल्यानंतर मी  तिथल्या तंत्रज्ञाला मला टेबलवरून खाली उतवरण्यास मदत करण्यासाठी माझ्या पतीला आत बोलावण्यास सांगितले. मात्र जेव्हा माझे पती मॅकएलिस्टर हे स्कॅनिंग रूममध्ये दाखल झाले. तेव्हा त्यांच्या गळ्यात २० पौंड वजनाची धातूची चेन होती. ते रूममध्ये येताच एमआरआय मशीनच्या शक्तिशाली चुंबकाने त्यांना आत खेचून घेतले. या यंत्राने त्यांना गिळून टाकलं असं तेव्हा मला वाटलं. त्यानंतर मॅकएलिस्टर यांना हृदयविकाराचे पाठोपाठ झटके आले आणि त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत मॅकएलिस्टर यांच्या मुलांनी तिथल्या तंत्रज्ञाना दोषी ठरवले आहे. त्यांनी फेसबूकवर लिहिले की, जेव्हा माझी आई एमआरआय स्कॅन करण्यााठी झोपली होती. तेव्हा तिला खाली उतरण्यास मदत करण्यासाठी तिथला तंत्रज्ञ माझ्या वडिलांना त्या खोलीत घेऊन आला. मात्र त्यांच्या गळ्यात असलेली चेन त्यांनी उतरवून ठेवली पाहिजे हे सांगण्यास तो विसरला. त्यामुळे हा अपघात झाला, असा आरोप त्यांनी केला.   

टॅग्स :AccidentअपघातMedicalवैद्यकीयUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय