इराकमध्ये आंदोलक -पोलिसांत धुमश्चक्री, 5 जणांचा मृत्यू
By Admin | Updated: February 12, 2017 06:55 IST2017-02-12T06:47:59+5:302017-02-12T06:55:09+5:30
इराकची राजधानी बगदादमध्ये आंदोलक आणि पोलिस यांच्यात धुमश्चक्री उडाली. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.

इराकमध्ये आंदोलक -पोलिसांत धुमश्चक्री, 5 जणांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
इराक, दि. 12 - इराकची राजधानी बगदादमध्ये आंदोलक आणि पोलिस यांच्यात शनिवारी धुमश्चक्री उडाली. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आणि निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिया मुस्लिमांचे धर्मगुरु मुक्तदा अल सद्र यांच्या समर्थकांमध्ये आणि पोलिसांत चकमक झाली. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्जही केला. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
दरम्यान, या रॅलीत हजारो आंदोलकांनी सहभाग घेतला होता. तसेच, ज्या ठिकाणी ही रॅली काढली त्या ठिकाणी सरकारी कार्यालये आणि विदेशी दूतावास आहेत.