शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

OpenAI वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचिर बालाजी यांच्या मृत्यूचे गुपित आईने उघड केले, FBI'कडे चौकशीची मागणी; इलॉन मस्क यांनीही दिले समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 09:47 IST

काही दिवसापूर्वी अमेरिकेत सुचिर बालाजी या तरुणाचा मृतदेह सापडला. या प्रकरणी आता त्याच्या आईने चौकशीची मागणी केली आहे.

काही दिवसापूर्वी अमेरिकेतली सॅन फ्रान्सिस्को येथे एका फ्लॅटमध्ये भारतीय अभियंता सुचिर बालाजी या तरुणाचा मृतदेह सापडला होता. सुचिर बालाजी यांनी OpenAI साठी काम केले आहे आणि कंपनीवर कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. आता त्याच्या मृत्यूच्या एका महिन्यानंतर त्याच्या आईने एफबीआय चौकशीची मागणी केली आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन, कर्करोगाने होते ग्रस्त

OpenAI व्हिसलब्लोअर आणि संशोधक २६ नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्नियातील त्याच्या सॅन फ्रान्सिस्को अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळले. अधिकाऱ्यांनी बालाजी यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे घोषित केले होते. रविवारी ट्विटरवर एका पोस्टमध्ये त्याची आई पूर्णिमा रामा राव यांनी सांगितले की, एका खासगी तपासनीसाची नियुक्ती केली आणि मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शरीराची दुसऱ्यांदा चाचणी केली.

बालाजी यांच्या बुकानन स्ट्रीटवर असलेल्या अपार्टमेंटची तोडफोड केल्याचा आरोपही रामाराव यांनी केला आहे. "बाथरुममध्ये भांडण झाल्याच्या खुणा होत्या आणि रक्ताच्या डागांच्या आधारे, कोणीतरी त्याला बाथरूममध्ये मारल्यासारखे दिसते.

एफबीआय चौकशीची मागणी करत रामाराव म्हणाले, "ही एक क्रूर हत्या आहे,  SF शहरातील वकिली आम्हाला न्याय मिळण्यापासून थांबवत नाहीत. खासगी शवविच्छेदनात पोलिसांनी सांगितलेल्या मृत्यूच्या कारणाची पुष्टी होत नाही, असेही ते म्हणाले.

उद्योगपती इलॉन मस्क यांचे आणि OpenAIचे सीईओ सॅम ऑल्टमन  यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद सुरू आहेत. मस्क यांनीही या पोस्टवर कमेंट केली आहे. 'हे आत्महत्येसारखे वाटत नाही', असं त्यांनी म्हटले आहे. इल़न मस्क यांनीही या हत्येवर संशय व्यक्त केला आहे.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कAmericaअमेरिका