सर्वाधिक वयोवृद्ध महिलेचा वाढदिवस

By Admin | Updated: July 7, 2015 23:05 IST2015-07-07T23:05:48+5:302015-07-07T23:05:48+5:30

जगातील सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती अशी नोंद असणाऱ्या महिलेने आपला ११६ वाढदिवस नुकताच साजरा केला असून, या महिलेने आधीच आपली दृष्टी गमावली आहे.

Most senior woman's birthday | सर्वाधिक वयोवृद्ध महिलेचा वाढदिवस

सर्वाधिक वयोवृद्ध महिलेचा वाढदिवस

न्यूयॉर्क : जगातील सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती अशी नोंद असणाऱ्या महिलेने आपला ११६ वाढदिवस नुकताच साजरा केला असून, या महिलेने आधीच आपली दृष्टी गमावली आहे. सुसान मुशात जोन्स, असे या महिलेचे नाव असून, सोमवारी तिने आपला वाढदिवस नातेवाईकांसोबत साजरा केला.
जोन्सचा जन्म १८९९ साली अलाबामा येथे झाला असून, १९२२ साली पदवीधर झाल्यानंतर ती न्यूजर्सी व न्यूयॉर्क येथे स्थलांतरित झाली. ती घरकाम व मुलांची काळजी घेण्याचे काम करीत असे.
 

Web Title: Most senior woman's birthday