शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनमध्ये 24 वर्षातील सर्वात भीषण अपघात; आठ भारतीय जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 11:09 IST

ब्रिटनमध्ये एका रस्ता अपघातात आठ भारतीयांचा जागीत मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देब्रिटनमध्ये झालेल्या एका रस्ता अपघातात आठ भारतीयांचा जागीत मृत्यू झाला आहे.या आठ जणांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. गेल्या २४ वर्षातला ब्रिटनमधला सर्वात भीषण अपघात असल्याचं बोललं जात आहे.

लंडन, दि. 28- ब्रिटनमध्ये झालेल्या एका रस्ता अपघातात आठ भारतीयांचा जागीत मृत्यू झाला आहे. या आठ जणांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हा अपघात गेल्या २४ वर्षातला ब्रिटनमधला सर्वात भीषण अपघात असल्याचं बोललं जात आहे. शनिवारी सकाळी बकिंगहॅमशायर मधील न्यूपोर्ट पॅगनेल इथे हा भीषण अपघात झाला. विप्रो कंपनीच्या आयटी प्रोफेशनल्सना आणि त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन जाणाऱ्या एका मिनीबसची दोन लॉरींसोबत धडक झाली. यात विप्रोचे ३ कर्मचारी जागीच ठार झाले तर चौथा कर्मचारी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बसचालकही या अपघातात ठार झाला. सिरीअॅक जोसेफ तो बसचालकही भारतीय होता. दोन्ही लॉरीचालकांना घटनास्थळीच अटक करण्यात आली आहे. या दोघांपैकी एकावर ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमवारी त्यांना युके कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

'कार्तिकेयन रामसुब्रमण्यम पुगलर, ऋषी राजीव कुमार आणि विवेक भास्करन अशी मृत्यू झालेल्या आमच्या तीन कर्मचाऱ्यांची नावं आहेत,' असं विप्रोचे युकेचे ऑपरेशन्स हेड रमेश फिलीप्स यांनी सांगितलं. या भीषण अपघातात मनो रंजन पन्नीरसेल्वम या आमचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. तसंच या अपघातात दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आम्ही आवश्यक ती मदत करू, असंही फिलीप्स यांनी सांगितलं.

FedEX लॉरी आणि एका ट्रकला धडकल्यानंतर या १६ आसनी मिनीबसचा चुराडा झाला. अग्निशमन दलाच्या ९ गाड्या आणि 35 जवानांनी  तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांनी अडकलेल्या चार जणांची सुटका केली. बसमध्ये चालकासह १२ भारतीय होते. हे सर्व केरळ आणि तामिळनाडूचे रहिवासी आहेत.  या भीषण अपघातात ठार झालेले बसचे चालक सिरीअॅक जोसेफ ऊर्फ बेनी यांचाही या अपघातात मृत्यू झाला. सिरीअॅक हे गेल्या 15 वर्षापासून युकेमध्ये राहत होते. ते मुळचे केरळचे असल्याची माहिती मिळते आहे. 

ब्रिटनमध्ये शनिवारी झालेला हा अपघात 24 वर्षातील सगळ्यात भीषण अपघात असल्याचं बोललं जात आहे. याआधी नोव्हेंबर 1993 मध्ये ब्रिटनच्या महामार्गावर अपघात झाला होता. यामध्ये 12 मुलं आणि त्यांच्या शिक्षकांचा मृत्यू झाला होता.  

टॅग्स :Accidentअपघात