शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

रस्त्याच्या कडेला बसले होते लोक, अचानक भूकंप आला अन्...; CCTV फुटेज पाहून थरकाप उडेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 21:27 IST

Morocco Earthquake : बचाव कार्यातील कर्मचार्‍यांना दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागत आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. भूकंपामुळे माराकेश या ऐतिहासिक शहरापासून ते अॅटलस पर्वतरांगांच्या परिसरात वसलेल्या गावांपर्यंत अनेक घरांचे अथवा इमारतींचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक देशांच्या नेत्यांनी मोरोक्कोला मदत देऊ केली आहे. बचाव कार्यातील कर्मचार्‍यांना दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागत आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

जेव्हा भूकंप आला, तेव्हा घरात झोपलेले लोक बाहेर धावू लागले. सरकारी टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात आलेल्या फुटेजमध्ये दिसत आहे की, माराकेश शहरातील लोक रात्री उशिरा रस्त्यांवर उभे असून घरात जाण्यासही घाबरत आहेत.

या भूकंपाचे एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यावरून, हा भूकंप किती भीषण होता, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही लोक एका इमारतीबाहेर बसलेले आहेत. याच वेळी भूकंप येतो आणि इमारत हालू लागते. येथे बसलेले तुरुण जमीन हादल्याचा भास होताच, तेथून पळ काढतात. 

एवढेच नाही, तर या फुटेजमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक धावपळ करताना दिसत आहेत. काही लोक रस्त्यावर पडताना दिसत आहेत. याच वेळी इमारतीचा काही भागही कोसळताना दिसत आहे. हा व्हिडिओ बीएनओ न्यूजने सोशल मिडिया साइट एक्सवर अपलोड केला आहे. आतापर्यंत दीड लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

काय म्हणतायत लोक? -स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, "भूकंपामुळे बहुतेक घरांचे नुकसान झाले आहे. आमचे शेजारी ढिगाऱ्याखाली दबले आहेत. लोक उपलब्ध साधनांचा वापर करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत." दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवताच आपण घरातून बाहेर धाव घेतल्याचे स्थानिक शिक्षक हमीद अफकार यांनी सांगितले.

टॅग्स :EarthquakeभूकंपDeathमृत्यूcctvसीसीटीव्हीSocial Mediaसोशल मीडिया