वर्षअखेर जगात लोकसंख्येपेक्षा अधिक मोबाईल
By Admin | Updated: September 5, 2014 02:59 IST2014-09-05T02:59:23+5:302014-09-05T02:59:23+5:30
चालू वर्षअखेर जगात मोबाईल फोनची संख्या जगाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त म्हणजे 7.3 अब्ज असेल, असे एका पाहणीत आढळले आहे.

वर्षअखेर जगात लोकसंख्येपेक्षा अधिक मोबाईल
दुबई : चालू वर्षअखेर जगात मोबाईल फोनची संख्या जगाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त म्हणजे 7.3 अब्ज असेल, असे एका पाहणीत आढळले आहे. सिलिकन इंडियाने इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियनच्या अभ्यासात हा निष्कर्ष निघाला आहे. त्यानुसार सध्या 6 अब्ज असलेले मोबाईल फोन येत्या डिसेंबरअखेर 7.3 अब्ज होतील.
आंतरराष्ट्रीय मोबाईल टॉपअप डिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क रोडेन यांनी म्हटले आहे की मोबाईलमुळे जगातील अनेक निर्धन भागात जीवनाचा स्तर सुधारण्यात मदत होऊ शकते. (वृत्तसंस्था)
4दूरसंचारच्या सुविधांची ज्या विकसनशील राष्ट्रांत टंचाई आहे तेथे मोबाईल फोन मोठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. जगातील काही देशांत त्यांच्या लोकसंख्येपेक्षा मोबाईल फोन्सची संख्या दुप्पट आहे. रशिया, ब्राझीलमध्ये तेथील लोकसंख्येपेक्षा जास्त मोबाईल फोन आहेत.