लाहोर हल्ल्याप्रकरणी 5 हजारांहून अधिक जणांची चौकशी
By Admin | Updated: March 29, 2016 18:57 IST2016-03-29T18:57:33+5:302016-03-29T18:57:33+5:30
लाहोर येथे करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत पाच हजारांहून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली आहे

लाहोर हल्ल्याप्रकरणी 5 हजारांहून अधिक जणांची चौकशी
>ऑनलाइन लोकमत -
इस्लामाबाद, दि. २९ - लाहोर येथे करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत पाच हजारांहून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. दोन दिवसांत ही चौकशी केली असल्याची माहिती पाकिस्तानी अधिका-याने दिली आहे. लाहोरमधील उद्यानात रविवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ७२ लोकांचा मृत्यू झाला होता. तालिबानने या हल्ल्याचे लक्ष्य ईस्टर साजरा करणारे ख्रिश्चन होते, असा दावा केला आहे. मृतांत २९ बालकांचा समावेश आहे.
चौकशी केल्यानंतर सर्वजणांची सुटका करण्यात आली. मात्र त्यापैकी 216 जणांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची माहिती पंजाब प्रांतातील राज्यमंत्री राना सनऊल्लाह यांनी दिली आहे. दहशतवाही हल्ल्यानंतर सर्व महत्वाच्या ठिकाणी धाडसत्र करण्यात आले आहे. पोलीस, दहशतवाद विरोधी पथक तसंच गुप्तचर यंत्रणांच्या संयुक्त कारवाईत या धाडी टाकण्यात येत आहेत. गरज लागल्यास निमलष्करी दलाचीदेखील मदत घेतली जाणार आहे.